Yog Din : योग दिनाला चर्चा मोदींच्या गमछाची! का आहे 'हा' गमछा स्पेशल?

आम्ही तुम्हाला सांगतो की हा सामान्य गमछा नाही, हा आसामचा गमछा आहे. चला तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.
narendra modi
narendra modisakal
Updated on

जे लोक आपल्या आरोग्याची खूप काळजी घेतात त्यांच्यासाठी कालचा दिवस खूप खास होता. काल, 21 जून रोजी जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेला. काल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7000 लोकांसमवेत डल लेकच्या किनारी श्रीनगरमध्ये योगा केला. त्याआधी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलं. काश्मीरच्या भूमीवरुन पीएम मोदींनी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या

पण, जेव्हा मोदींचे फोटोज समोर आले, तेव्हा त्यांच्या गमछाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आम्ही तुम्हाला सांगतो की हा सामान्य गमछा नाही, हा आसामचा गमछा आहे. चला तर त्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो.

का आहे 'हा' गमछा स्पेशल?

'आसामचा गमोसा' हे आसामचे पारंपारिक पोशाख आहे, त्यामुळे त्याचे स्वतःचे महत्त्व आहे. तिथल्या संस्कृतीचं आणि परंपरेचं हे प्रतीक आहे. गमोसा या शब्दाची उत्पत्ती 'अंगोछा' या शब्दापासून झाल्याचे अनेक लेखक सांगतात. आसामचे लोक हा स्पेशल गमछा पाहुण्यांना देतात.

ते कसे दिसते?

बहुतेकदा तुम्हाला ते पांढऱ्या रंगात दिसेल. पांढऱ्या सुती कापडावर लाल किंवा हिरवा असे दोन रंग वापरून हे काम केले जाते. हा सहसा पांढरा आयताकृती कापडाचा तुकडा असतो, ज्याच्या तीन बाजूंनी बॉर्डर असते आणि चौथ्या बाजूला विणलेली डिझाइन असते. ते फक्त सुती कापडापासूनच बनते, पण विशेष प्रसंगी ते पारंपारिक आसामी सिल्कसारखे महागडे कापड आणि वेगवेगळ्या रंगात देखील बनवले जाते.

आसाममधील या गमोसाला 2022 मध्ये GI टॅग देण्यात आले आहे. गमोसाला जीआय टॅग मिळाल्यावर हजारो विणकरांनी त्याचा आनंद साजरा केला होता.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()