काल व्हॅलेंटाईन डे झाला. प्रेमाचा सण अनेकांसाठी खुशीचा तर काही जणांसाठी दुःखाचा दिवस. खूप जणांचे ब्रेकअप सुद्धा याच दिवशी होतात. त्यासाठी अँटी व्हॅलेंटाईन आठवडा साजरा होतो. त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या साठी घेऊन आलोय सध्याची GenZ पिढी रिलेशनशिपच्या चढउताराबद्दल काय म्हणते?
आजकाल 'जेन-झी' हा ट्रेंड सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आणि प्रसिद्ध होत आहे. आजकाल तरुणांची नवी पिढी आली आहे. लोक या पिढीला जेन-झी असे म्हणतात. या लोकांची स्टाईल पूर्णपणे वेगळी आहे. त्यांची बोलण्याची पद्धत, कपडे घालण्याची स्टाईल सामान्य लोकांपेक्षा वेगळी आहे. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर डेल्युलू (Delelu) सोलुलू (solulu)अशा प्रकारचे शब्द फारच जास्त ट्रेंडमध्ये आहेत.
जेन-झी म्हणजे जनरेशन झेड. उदा. 1980 आणि 1990 मध्ये जन्माला आलेल्या पिढीला ‘मिलेनियल्स’ असं म्हणतात. तर 1990 च्या शेवटी ते 2000 च्या सुरुवातीच्या टप्प्यात जन्माला आलेली पिढी म्हणजेच जेन-झी होय.
एखाद्या व्यक्तीशी असलेले नातेसंबंध अचानक तोडून टाकण्याला घोस्टिंग असं म्हणतात. घोस्टिंग ही संकल्पना आता फक्त कपल्ससाठी मर्यादित राहिलेली नाही. यात पुढे Haunting आणि Zombing सारखे प्रकार देखील आहेत.
दोन असे व्यक्ती जे एकमेकांचे सोलमेट होऊही शकतात किंवा नाहीही. जेव्हा नात्याला ठराविक टॅग/लेबल द्यायचं नसतं.
‘Delulu is the Solulu’ ही टर्म सध्या चांगलीच चर्चेत आहे. याचा अर्थ Delusion is the solution असा होतो. एखादी व्यक्ती आपल्या प्रेमात आहे अशा भ्रमात रहाणं आणि त्या स्वप्नातून सकारात्मकता शोधणे.
रिलेशनशिपमध्ये आहात पण ब्रेकवर असता.
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर नात्यात असता पण त्याचवेळी बॅकअप ऑप्शन म्हणून एखाद्याचा विचार करत असता.
यात कपल एकमेकांशी फ्लर्ट करतात पण ते डेट करत नाही. यात दोघेही सिरीयस नसतात. कोणतीही कमिटमेंट दिली जात नाही. कोणतीही अपेक्षा ठेवली जात नाही ज्याला जे पाहिजे ते तो करु शकतो.
green flag : अशी व्यक्ती जी तुमच्यासाठी एकदम आदर्श आहे आणि तुम्ही त्या नात्यात पुढे पाऊल टाकावं.
Pink flag : छोटी मोठी भांडणं किंवा नात्यात किरकोळ अडचणी आल्या तरी give up न करता त्या नात्याला एक संधी देणं.
Beige flag : अशी व्यक्ती जी नातेसंबंधात प्रयत्न करत नाही. एक प्रकारे बेज प्लॅग हा बोरिंग व्यक्तीला संबोधले जाऊ शकते.
Red flag: पार्टनरला चिट करणे, फ्रिडम किंवा स्पेस न देणे, अशी लक्षणं जर एखाद्या व्यक्तीमध्ये दिसत असतील तर लगेच सावध व्हा.
एखाद्या व्यक्तीला डेटसाठी भेटायला गेल्यानंतर ड्रिंक्स न घेणे, म्हणजेच तुमची कॉफी डेट.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.