पृथा वीर
लग्नसराई सुरू असताना फॅशन मार्केटमध्ये सर्वाधिक चर्चेत असते ती साडीची. साडी हा प्रकार कधीही फॅशनमध्ये बाहेर जात नाही. उलट कितीही ट्रेंड फॉलो केले, तरीही लग्नातील एखाद्या तरी कार्यक्रमात साडी परिधान करावीशी वाटते; पण प्रश्न पडतो तो साडी परिधान करण्याचा. कितीही इच्छा असली, तरी साडी नेसून खरेच नीट वावरता येईल का, असा प्रश्न पडतो. साडी परिधान केली हात मोकळे राहत नाहीत. त्यामुळेच लग्नात बरेचदा डिझायनर ड्रेसला पसंती असते. हीच अडचण हेरून डिझायनर्सनी पॉकेट साडी किंवा झिप साडी तयार केली असून हा ट्रेंड प्रचंड लोकप्रिय होतोय.