Post Pregnancy Yoga : प्रसुतीनंतर सर्वात जास्त कोणत्या गोष्टीचा त्रास होत असेल. तर, ती आहे सुटलेलं पोट. कारण, गर्भधारणेत बाळाच्या वजनामुळे पोटाचा आकार वाढलेला असतो. त्यामुळे प्रसुतीनंतर पोट वाढलेलं असतं. ते पुन्हा पुर्ववत आणणे म्हणजे अशक्यच वाटतं.
वाढलेले पोट तुम्ही वेळीच कमी केले नाही, तर तुम्हाला गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. वाढलेल्या वजनामुळे रक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, कॅन्सर यांसारखे आजार होऊ शकतात. पण घाबरण्याचं कारण नाही. वाढलेले पोट कमी करण्यासाठी तुम्ही योग्य आहार आणि व्यायाम केला, तर या समस्या उद्भवणार नाहीत.
यासाठी जीममध्ये तास-न्-तास कठीण कसरती करण्याचीही आवश्यकता नाही. तुम्ही घरामध्ये सोप्या योगासनांचा अभ्यास करू शकता. नियमित योगासनांचा योग्य सराव केल्यास तुमचं वजन नियंत्रणात राहण्यास मदत होईल. योगासनांमुळे शारीरिक तसंच मानसिक फायदेही मिळतात.
एवढंच नाही तर मोठ-मोठ्या आजारांमधूनही सुटका होते. वाढलेले वजन, सुटलेले पोट कमी करायचं असेल तर आजपासूनच या सात योगासनांचा नियमित सराव करा.
मत्स्यासन
योग मॅटवर पाठीवर झोपावे, आपले पाय एकमेकांना जुळलेले असायला हवेत, तसेच आपले शरीर आरामात टेकवावे.
आपले हात हिप्सखाली ठेवावे, हात जमिनीच्या दिशेने असतील. आता आपले कोपर एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न करा.आपले दोन्ही कोपर कंबरेजवळ असतील.
पायाची मंडी घालावी. मांड्या आणि गुडघे फरशीवर सरळ राहतील.
श्वास घेत घेत छाती वरच्या बाजूला उचलावी. डोके वरच्या बाजूला उचलावे आणि डोक्याचा वरचा भाग जमिनीला स्पर्श करेल या स्थितीत यावे.
शरीराचे संपूर्ण वजन फक्त कोपरावर किंवा फक्त डोक्यावर येणार नाही याची काळजी घ्या.
जसजसे छातीचा भाग उचलला जाईल तसतसा खांद्याच्या मसल्सवर हलकासा दबाव पडत असल्याचे जाणवेल.
या स्थितीमध्ये तोपर्यंत रहा जोपर्यंत आपल्याला शक्य असेल. श्वासाची गती नॉर्मल राहू द्या.
श्वास बाहेर सोडत हळू हळू पूर्वस्थितीत या.
सगळ्यात आधी डोके उचला आणि त्यानंतर छाती जमिनीच्या दिशेने घेऊन या. पाय सरळ करून या स्थितीत आराम करा.
प्राणायम
प्राणायाम करण्यासाठी सकाळची सूर्योदयाची वेळ ही सर्वात योग्य मानली जाते. हे आसन आपण संध्याकाळी मावळतीच्या सूर्यासोबतही करू शकतो.
प्राणायाम करण्यासाठी पद्मासनात बसून डोळे बंद करावे.
तुमचा पाठीचा कणा सरळ असावा.
श्वासाकडे आपले लक्ष केंद्रित करावे.
श्वासावर लक्ष केंद्रित करून, नाकातून हळू हळू लांब आणि खोल श्वास घ्या.
यानंतर श्वास हळूहळू सोडावा लागतो.
तोंडातून हळू श्वास घेणे आणि "हम्म" किंवा 'ओम' म्हणत श्वास सोडणे.
प्राणायाम करताना तुमचे लक्ष श्वासावर असणे खूप महत्वाचे आहे.
स्ट्रेचिंग
सर्वात पहिले जमीनीवर ताठ बसा आणि दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या.
आता दोन्ही हातांचे तळवे एकमेकांमध्ये गुंफून वरच्या बाजूला स्ट्रेच करा.
नंतर दोन्ही हात पुढच्या बाजूला स्ट्रेच करा आणि तसेच मागच्या बाजूलाही खेचा.
हे स्ट्रेचिंग दिवसातून 2 ते 3 वेळा केल्यास आखडलेलं शरीर सैलावायला मदत होईल. आणि
पाठीचा, मानेचा त्रास कमी होऊन ऑफीसचे काम अधिक कार्यक्षमतेने करता येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.