Potato Peel Benefits : बटाटा सोलून खाण्याची चूक कधीच करू नका, हे फायदे वाचून थक्क व्हाल!

बटाट्याच्या साली पोटॅशियममध्ये समृद्ध आहेत
Potato Peel Benefits
Potato Peel Benefitsesakal
Updated on

Potato Peel Benefits :

भारतीय घरांमध्ये पूर्वापार काही गोष्टी केल्या जातात. त्यातही स्वयंपाकातील सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या मानल्या जातात. स्वयंपाक परंपरागत चालत आलेल्या पद्धतीनेच केला जातो. आपल्याकडे भाज्या सोलून, चिरून घेणे महत्त्वाचे असते. जेव्हा बटाट्याचा विषय येतो. तेव्हा बटाटा सोलूनच खावा असं आपल्याला सांगितलं जातं.

आपल्याला बटाट्याची सालं फेकून देण्याची सवय आहे. हे लक्षात न घेता ते पोषक तत्वांचे भांडार आहेत. बटाट्याची साल ही कचऱ्यात आढळणारी सर्वात सामान्य भाजीची साल आहे. बटाट्याच्या सालीमध्ये अनेक रोगांशी लढण्याची क्षमता असते आणि भाज्यांपेक्षा जास्त फायदेशीर असतात.

Potato Peel Benefits
District Onion-Potato Union Election: कांदा-बटाटा संघासाठी 31 डिसेंबरला मतदान! पहिल्याच दिवशी 39 अर्जांची विक्री

प्रतिकारशक्ती वाढवते

बटाट्याच्या साली व्हिटॅमिन सीने समृद्ध आहेत. त्या एक शक्तिशाली अँटिऑक्सिडेंट एजंट म्हणून कार्य करतात. बटाट्याच्या सालींमध्ये कॅल्शियम आणि बी-कॉम्प्लेक्स जीवनसत्त्वेही भरपूर असतात जी रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतात.

कर्करोगापासून संरक्षण करते

बटाट्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात फायटोकेमिकल्स असतात. जे शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स म्हणून काम करतात. याशिवाय, त्यात क्लोरोजेनिक ऍसिड देखील असते जे शरीराला कर्करोगापासून वाचवते.

कोलेस्ट्रॉल कमी करते

ते फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स, पॉलिफेनॉल आणि ग्लायकोआल्कलॉइड्सने समृद्ध असतात जे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.

Potato Peel Benefits
Diwali Recipe 2023 : दिवाळीला करा बटाटा मसाला मठरी! एकदम सोपी आहे रेसिपी

हृदयाची काळजी घेते

बटाट्याच्या साली पोटॅशियममध्ये समृद्ध आहेत. जर या योग्य प्रमाणात आपल्याला प्रोटीन मिळत असेल. तर हृदयरोगापासून आपली सुटका होऊ शकते. यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होतो.

त्वचा स्वच्छ करते

बटाटा त्वचेवर लावल्याने अनेक फायदे होतात. तसेच त्वचेसाठी बटाट्याच्या सालीही फायद्याच्या आहेत. साली त्वचेवर वापरण्यासाठी आरोग्यदायी मानले जातात, कारण त्यात बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ, फिनोलिक आणि अँटिऑक्सिडंट संयुगे असतात ज्यांचा सौम्य ब्लीचिंग प्रभाव असतो आणि डार्क स्पॉट हलके होतात.

Potato Peel Benefits
Beauty Tips : Latte Coffee तर प्यायलेच असाल, पण Latte Makeup केलाय का? जाणून घ्या टिप्स

हाडांसाठी चांगले

बटाट्याच्या सालीत लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, कॅल्शियम, तांबे आणि जस्त असतात. ते एकत्रितपणे हाडांची झिज होण्यापासून रोखण्यास मदत करते. तसेच, स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी करण्यास मदत करतात.

केसांना सुंदर बनवते

तज्ज्ञांच्या मते, बटाट्याच्या सालीच्या रसाने डोक्याला मसाज केल्याने केसांना शाईन येते. तसेच, ज्यांचे केस वाढत नाहीत. त्यांनी बटाट्याची साल मिक्सरवर पेस्ट करून केसांना लावावी. यामुळे केसांची वाढ जलद होते.

Potato Peel Benefits
Beauty Tips : नेलपेंट बाटलीतच कडक होते? ४ उपाय, टिकेल अनेक महिने..!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()