Prachi Nigam : मागील काही दिवसांपूर्वीच देशातील काही राज्यांचे दहावी आणि बारावीच्या बोर्डाचे निकाल लागले. यामध्ये उत्तर प्रदेश बोर्डाची विद्यार्थिनी प्राची निगमला दहावीच्या परीक्षेत ९८% टक्क्यांहून अधिक गुण मिळाले होते. तिने उत्तर प्रदेश बोर्डात अव्वल स्थान पटकावल्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली होती.
परंतु, सोशल मीडियावर अनेकांनी तिच्या क्षमतेबद्दल, गुणवत्तेबदद्ल बोलण्यापेक्षा तिच्या दिसण्याबद्दल चर्चा केली होती. अनेकांनी तिला चेहऱ्यावरील केसांवरून मोठ्या प्रमाणात ट्रोल केले होते. परंतु, आता प्राचीने अशा लोकांची तोंड कायमची बंद केली आहेत. तिचा एक मेकओव्हरचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला असून, तिने यातून एक संदेश दिला आहे, ज्यामुळे, लोक तिचे कौतुक करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावरील स्टार आणि संगीतकार अनिश भगतने टॉपर प्राची निगमची नुकतीच भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतेय की, अनिश प्राचीला तिच्या महमुदाबाद येथील घरी भेटतो आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने तिचा मेकओव्हर करतो.
अनिश सुरूवातीला तिच्या घराची बेल वाजवतो, प्राचीने दार उघडल्यानंतर तो तिला फुले भेट देतो. त्यानंतर, तो व्हिडिओमध्ये म्हणतो की, मी आज ठरवले आहे की, मी प्राचीचा आज ग्लो-अप करेन आणि संपूर्ण देश तिला पाहिल.
त्यानंतर पुढे व्हिडिओमध्ये दिसते की, प्राची तिच्या डोळ्यांना मस्करा लावते. परफ्यूमचा वापर करते आणि केस सेट करते. परंतु, पुढच्याच क्षणी एक ट्विस्ट येतो, जेव्हा प्राचीचा कोणताही मेकओव्हर झाल्याचे दिसून येत नाही. ती तिच्या चेहऱ्यावर हात ठेवून सुंदर स्माईल करते आणि म्हणते की, ‘’मी अगदी तशीच दिसतेय, प्रिय महिलांनो तुम्ही कधीच न बिघडलेली गोष्ट दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू नका की, जी कधीच बिघडली नाही’’
या व्हिडिओतून प्राचीने एक सुंदर संदेश दिला आहे की, तुम्ही जसे आहात, तसेच राहण्याचा प्रयत्न करा. जी गोष्ट कधी बिघडलीच नव्हती ती दुरूस्त करण्याचा प्रयत्न करू नका.
अनिशने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामला शेअर करताना लिहिलय की, 'हे त्या सर्व लोकांसाठी आहे, जे असुरक्षित आहेत किंवा असुरक्षिततेच्या भावनांनी भरलेले आहेत आणि ते चमकण्याची वाट पाहत आहेत. तुम्ही सर्वजण स्वत:शी थोडे चांगले वागण्यास पात्र आहात. स्वत:वर जास्त कठोर होऊ नका. त्याने ट्रोलर्ससाठी ही एक ओळ लिहिलीय आणि त्यात म्हटलयं की, मला आशा आहे की हे एकदाच सर्व ट्रोलर्सची बोलती बंद करेल.
दरम्यान, प्राचीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आतापर्यंत ३ लाख लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. शिवाय, या व्हिडिओवर लोक कमेंट करून प्राचीचे कौतुक करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.