Pradosha Vrat 2024: आज कार्तिक महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत आहे. आज बुधवार असल्याने त्याला बुध प्रदोष व्रत बोलले जात आहे. या दिवशी भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास मुलांची बुद्धी आणि आरोग्य सुधारते. या दिवशी महादेवाची पूजा करणाऱ्यांना मोक्ष प्राप्त होतो. बुध प्रदोषाच्या दिवशी माता पार्वती आणि विघ्न दूर करणाऱ्या श्रीगणेशासह भगवान शिवाची पूजा करण्याची परंपरा आहे. प्रदोष व्रताच्या पूजेची योग्य वेळ कोणती हे जाणून घेऊया.