झूम : सीएनजीला लोकप्रियतेचा ‘बूस्टर’

पेट्रोल-डिझेलच्या तुलनेने कमी दर, परिणामी कमी खर्चात होणारा प्रवास, मायलेज आणि सीएनची पंपांची उपलब्धता यामुळे सीएनजी वाहने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत.
CNG vehicle
CNG vehiclesakal
Updated on

पेट्रोल-डिझेलच्या तुलनेने कमी दर, परिणामी कमी खर्चात होणारा प्रवास, मायलेज आणि सीएनची पंपांची उपलब्धता यामुळे सीएनजी वाहने मोठ्या प्रमाणात विक्री होत आहेत. सध्याचा सीएनजी वाहनांच्या विक्रीचा आकडा पाहता या दशकाच्या अखेरपर्यंत कार उद्योगातील एकूण २५ टक्के बाजार सीएनजी व्यापणार, असा दावा कार कंपन्यांकडून केला जात आहे.

गेल्या तीन-चार वर्षांपासून सीएनजी कार अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत. याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे सीएनजी कारचे बरेच म्हणजे १७ ते १८ मॉडेल्स विविध श्रेणींत, आकर्षक किमतीच्या पर्यायांत बाजारात उपलब्ध आहेत. दुसरे म्हणजे सीएनजी पंपांची देशात वाढणारी संख्या. तीन ते चार वर्षांपूर्वी देशात सीएनजी पंपांची संख्या १,५०० हून कमी होती. आज हीच संख्या आता ५,५०० हून अधिक असल्याची माहिती टाटा मोटर्स प्रवासी वाहन विभाग विपणन प्रमुख विनय पंत यांनी दिली.

महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, हरियाना यासारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्ये सीएनजी पंपांचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. सीएनजी कारचा वार्षिक चक्रवाढ दर (सीएजीआर - कम्पाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट) ३५ टक्के तर; गेल्या वर्षीच्या तुलनेतील वाढ (जीओएलवाय- ग्रोथ ओव्हर लास्ट ईअर) ५२ टक्के इतकी असल्याचेही पंत यांनी सांगितले. गेल्या वर्षी देशभरात विविध श्रेणीतील ४ लाख सीएनजी कारची विक्री झाली. त्यात टाटा मोटर्सच्या ५० हजार सीएनजी कारचा समावेश असल्याचे पंत म्हणाले.

पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा आणि सीएनजी फिलिंग स्टेशन्सची देशभरात पुरेसी उपलब्धता यामुळे सीएनजी कार विक्रीत वाढ होत आहे. सध्या ३० ते ३५ हजार सीएनजी वाहनांची दर महिन्याला विक्री होते. सीएनजीचे दर वाढल्याने या कार्सची विक्री मंदावली होती; परंतु ''किरीट'' समितीच्या दरांमध्ये सुधारणा करण्याच्या शिफारशीनंतर या कार्सची विक्री पुन्हा वाढली आहे.

सीएएफई नॉर्म्स

सध्या कार बाजारात सीएनजी वाहनांचे प्रमाण १० ते १२ टक्के आहे. ते या दशकाच्या अखेरपर्यंत २० ते २५ टक्के इतके असेल. तसेच मूळ उपकरणांचे उत्पादन (ओईएम-ओरिजीनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स) करणाऱ्यांवर कॉर्पोरेट इंधन अर्थव्यवस्थेचे नियम (सीएएफई नॉर्म्स) पूर्ण करण्याचा दबाव असतो. सीएनजीच्या बाबतीतही हेच निकष पाळावे लागतात.

‘टाटा’चे स्मार्ट तंत्रज्ञान

  • टाटा मोटर्सने विविध इंधन पर्यायात वाहन बाजारात दाखल करण्याचे धोरण सध्या आखले आहे. त्यात सीएएफई नॉर्म्स आणि तीव्र उत्सर्जनाचे मापदंड पाळले जात आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन टाटाने फॅक्टरी फिटेड सीएनजी किट विकसित केले आहे.

  • टाटाने ‘आय-सीएनजी’ या स्मार्ट तंत्रज्ञानाद्वारे टिआगो-टिगॉर ही वाहने विविध फीचर्ससह बाजारात दाखल केली. आय-सीएनजीचे एक वैशिषट्य म्हणजे कार सीएनजी मोडमध्येच सुरू होते, जेथे अन्य कंपन्यांच्या कार पेट्रोलद्वारे सुरू होतात.

  • सीएनजी टँकमुळे कारच्या बूट स्पेसमध्ये सामान ठेवण्याची अडचण निर्माण होते. यावर मात करत टाटाने हॅचबॅक श्रेणातील ‘अल्ट्रोज’ कारमध्ये सीएनजी ट्विन सिलिंडरसह बूटस्पेस, सनरूफ, वायरलेस चार्जर आदी फीचर्स देत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()