Zoom: डार्क रेड ‘सफारी’ला स्पोर्टिव्ह तडका

एसयूव्ही श्रेणीतील कारबद्दल ग्राहकांच्या अपेक्षा हल्ली वाढत चालल्या आहेत.
safari car
safari carsakal
Updated on

एसयूव्ही श्रेणीतील कारबद्दल ग्राहकांच्या अपेक्षा हल्ली वाढत चालल्या आहेत. बाजारात पर्यायही अनेक आहेत; परंतु टाटाने प्रत्येक वेळेस कारप्रेमींच्या अपेक्षांची दखल घेत वाहनांमध्ये बदल करून ते बाजारात आणले. ‘सफारी’ही त्यापैकी एक. प्रवाशांच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेणाऱ्या टाटा मोटर्सने सफारीत सुरक्षेची साधने दिली असताना ‘डार्क रेड’ही तितकीच आकर्षक आणि अद्ययावत श्रेणी सादर केली. कशी वाटली ‘सफारी रेड डार्क’, याबद्दल सविस्तर...

फेब्रुवारी २०२१ मध्ये टाटांनी त्यांची लोकप्रिय सफारी वेगळ्या लूकमध्ये बाजारात आणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. कारण फर्स्ट जनरेशन सफारी अधिक प्रीमियम झाली, तिच्यात अंतर्गत-बाह्य बदलही करण्यात आले. २०२१ नंतर सफारीचे ॲडव्हेंचर, पर्सोना, काझिरंगा, जेट आदी एडिशन विशिष्ट उद्देशाने लाँच करण्यात आल्या. जानेवारी २०२२ मध्ये सफारीची डार्क श्रेणी बाजारात आली. नावाप्रमाणेच सर्व डार्क काळ्या रंगातील ही कार अधिक उठावदार दिसू लागली; परंतु ग्राहकांना दरवर्षी नवीन देण्याच्या प्रयत्नांची परंपरा २०२३मध्ये कायम ठेवत फेब्रुवारी महिन्यात ‘डार्क रेड’ श्रेणी सादर केली.

सफारी डार्क रेडमध्ये इंजिनचे स्पेसिफिकेशन आधीप्रमाणेच ठेवत लाल रंगांचा खुबीने वापर केला आहे; शिवाय आधुनिक चालक सहाय्यक प्रणाली अर्थात ‘एडव्हान्स्ड ड्रायवहर आसिस्टन्स सिस्टीम’ (एडास) ही यंत्रणाही दिली आहे. यामध्ये ६-स्पीड मॅन्युअल आणि ६-स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशन, ६-७ आसनांचा पर्याय दिला आहे. शिवाय एक्सझेड, एक्सझेड प्लस, एक्सझेड प्लस (ओ) असे व्हेरिएंट येतात. या कारची एक्स शोरूम किंमत २२ लाख ६१ हजार ५०० ते २५ लाख एक हजार ५०० या दरम्यान आहे. सफारीच्या एक्सझेड प्लस (ओ) ६-स्पीड व्हेरिएंटची राईड केली.

लूकच्या बाबतीत रेड डार्क खूपच लक्ष वेधते. पूर्णत: काळ्यारंगासह ग्रीलवर रेड इलेमेंट साईड पॅनलवर क्रोम चौकटीवर #डार्कचा लोगो, डिस्क ब्रेकवरील रेड कॅलिबर आदींमुळे ही कार अधिक उठावदार दिसते. आपल्या श्रेणीतील चांगल्या उंची आणि लांबीमुळे सफारी आधीच रस्त्यावर अधिराज्य गाजवत होती; परंतु डार्क रेड एडिशनमुळे सफारीला ‘स्पोर्टिव्ह तडका’ मिळाला. बाह्यभागाप्रमाणेच सफारी डार्क रेडचे अंतरंगही तितकेच ‘अतरंगी’ आहे. सर्व सीट्स लाल रंगात शिवाय डोअर हँडल, सेंट्रल कन्सोलवर लाल रंगाचा खुबीने वापर केला आहे. रेड ॲम्बिएंट लाईटिंगच्या बरोबरच सनरुफला रेड मून लाईटही मिळते. एकूणच लाल आणि काळ्या रंगाची थीम केबिनला अधिक प्रीमियम बनवते.

‘डार्क रेड’मध्ये नवीन काय?

डार्क रेडमध्ये सर्वात मोठा बदल आहे तो इन्फोटेन्मेंट सिस्टिम. १०.२५ इंचीचा स्क्रीन दिला असून त्याची रचना/थीम पूर्णत: बदलली आहे. ऑपरेटिंगला एकदम स्मूथ, चांगले ग्राफिक्स दिले आहे, ज्यामुळे आपल्याला क्विक रिस्पॉन्स मिळतो. सफारीत आता ३६० डिग्री कॅमेरा येतो ज्याचा दर्जाही चांगला आहे. मल्टिपल अँगल कॅमेरा, ३-डी व्ह्यूची रचनाही सोयीस्कर ठरते, ज्यामुळे गल्ली बोळातील रस्ते किंवा पार्किंगमधून बाहेर पडण्यास मदत होते. डार्क रेडचे इन्स्ट्रूमेंट क्लस्टरही अपग्रेड केले आहे. सुरक्षेच्या बाबतीत सर्वांत आधुनिक एडास फीचर यामध्ये आहे.

पहिल्यापेक्षा अधिक स्मूथ

सफारी डार्क रेडच्या इंजिनमध्ये कोणतेही बदल केलेले नाहीत. यामध्येही क्रायोटेक २.० लिटर, १९५६ सीसी टर्बोचार्ज्ड डिझेल इंजिन दिले असून जे १६७.६७ बीएच पॉवर, ३५० एनएम टॉर्क जनरेट करते. तरीही सफारी डार्क रेड राईडला पहिल्यापेक्षा अधिक स्मूथ वाटली. इंजिन रिफाईन केल्याचा फील आला. टर्बो इंजिनमुळे गाडीतून मिळणारी पॉवर किंवा हँडलिंग तुलनेने अधिक प्रभावी वाटली. ड्रायव्हिंग सिटवर बसून राईड करताना एसयूव्ही राईडचा वेगळा आनंद सफारी देते. बाकी एका प्रीमियम एसयूव्हीसाठी ४०-५० लाख गुंतवण्यापेक्षा अस्सल देशी बनावटीची नव्या रुपात आलेली ‘सफारी’ची सफर करायला हरकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()