- ॲड. प्रवीण निकम
उच्चशिक्षणासाठी परदेशामध्ये शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या व तिकडे शिकत असलेल्यांनी शैक्षणिकदृष्ट्या विचार करताना चौकस व चिकित्सक राहणे आवश्यक आहे. खरेतर, आपल्याला परदेशी शिक्षण कोणत्या क्षेत्रात घ्यायचे आहे व कुठे घ्यायचे आहे, याचा प्राथमिक पातळीवर अभ्यासपूर्वक विचार करायला हवा.
कारण, यापुढे आपण अभ्यासक्रम पूर्ण करताना व भविष्याच्या दृष्टीने कोणते क्षेत्र निवडावे हा प्रश्न सुद्धा सुटू शकतो. तेव्हा परदेशामधील कॉलेजमध्ये ज्यांना शिक्षण घ्यायचे आहे, यासाठी पूर्वतयारीकरिता कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत. याविषयी आज या लेखामार्फत समजून घेऊयात.
अशी करा तयारी...
परदेशातील प्रत्येक विद्यापीठाचा अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हा वेगवेगळा असतो. आपल्याकडील अभ्यासक्रमापेक्षा परदेशी शिक्षणाच्या अभ्यासक्रमाची पद्धती लवचिक आहे. तिथे प्रवेश मिळवण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शैक्षणिकदृष्ट्या आवश्यक प्रवेशप्रक्रिया पूर्ण करायची गरज असते.
म्हणून आपला अभ्यास चौफेर असावा. पदवीपूर्व शिक्षणाच्या प्रवेशासाठी सॅट, पीटीई,टोफेल, जीमॅट किंवा आयईएलटीएससारख्या परीक्षा आहेत. या उत्तीर्ण होण्यासाठी नित्यनेमाने वाचन आवश्यक आहे. तर याची तयारी कशी करावी परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या पुस्तकांचे किमान एकवेळ तरी वाचन होणे गरजेचे आहे.
भाषा विषयाचा विचार करता इंग्रजी विषयाच्या आधारित व्याकरण व लेखनकौशल्य या सरावाच्या बाजू आहेत. त्यानुसार सूक्ष्म वाचन करून सराव करावा. वाचन करताना परीक्षेचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे.
आपण कोणत्या परीक्षेला बसणार आहोत, त्यासाठी कोणता अभ्यासक्रम आहे. याचे स्वरूप तुम्हाला समजले की अभ्यास करणे सोपे जाते. ही पद्धत अधिक प्रभावी ठरून उत्तम गुण देखील मिळतात. सोबत अभ्यासाचा नियोजित आराखडा असल्यास ही पूर्वतयारी करण्यात अधिक मदत होते.
मुख्यत्वे या सर्व परीक्षांमध्ये लेखन, वाचन, मौखिक व लिखित कौशल्यांवर अधिक भर दिला जातो. अनेक प्रवेश परीक्षांसाठी गणित व बुद्धिमापन कौशल्ये महत्त्वाची असतात. त्यामुळे या आधारित कोणतेही पुस्तक वाचत असताना नोट्स काढण्याची सवय लावल्यास अधिक उपयुक्त ठरते. आपण कोणते पुस्तक वाचतो; यापेक्षा कसे पुस्तक वाचतो? हे महत्त्वाचे आहे.
परीक्षेत विशिष्ट मिनिटांमध्ये प्रश्न सोडवणे गरजेचे असते. त्यामुळे वेळ व्यवस्थापन कौशल्ये सुधारण्यासाठी कालबद्ध परिस्थितीत प्रश्नांचा सराव करायला हवा. अभ्यासाचे वेळापत्रक तयार करा, पुनरावलोकन करण्यासाठी काही चाचणी मागील पेपर्स किंवा सराव परीक्षांविषयी अधिक माहिती शोधा आणि त्यांचा वापर करून तुमच्या परीक्षेत कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना सामोरे जावे लागेल.
याविषयी अभ्यास माहिती सातत्याने घेत राहा. आपण कशापद्धतीने चांगली उत्तरे देऊ व लिहू शकतो यासाठी कायम स्वतःला प्रोत्साहित करत राहा. यासंदर्भात नियमितपणे वाचन केल्याने शब्दसंग्रह आणि आकलन कौशल्ये तयार करण्यात मदत होऊ शकते, जी प्रवेश परीक्षेतील यशासाठी आवश्यक आहेत.
उच्चशिक्षणासाठी परदेशी शिक्षणाचा विचार करत असताना आपल्याकडे फक्त हुशार व श्रीमंत मुले ही परदेशी शिक्षणाची स्वप्ने बघतात व परदेशात जातात. हा सगळ्यात मोठा गैरसमज सर्व स्तरावर दिसून येतो. पण सामान्य व बिकट परिस्थिती असणारे देखील या वाटेवर हिंमतीने प्रवास करू शकतात. यासाठी पूर्वमाहिती असणे आवश्यक आहे. या माहितीसह आत्मविश्वास आणि प्रेरणांद्वारे उत्तम पूर्वतयारी करून परदेशी शिक्षण घेणे सहज शक्य होईल
(लेखक हे ''समता सेंटर'' या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक आहेत आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथे चेवेणिंग स्कॉलर आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.