Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?

डोहाळे लागले म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ पोषक असतो का?
Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?
esakal
Updated on

Pregnancy Care :

प्रत्येक व्यक्तीला काय आवडत आणि काय नाही आवडत हे ठरलेलं असतं. घरात एखादा पदार्थ,भाजी, नाश्ता सर्वच जण खातात. मात्र, त्या न खाणाऱ्या व्यक्तीसाठी वेगळे जेवण बनवले जाते. विशेषत: गरोदर असलेल्या महिलेला जीवनात कधीही न खाल्लेले पदार्थही खावेसे वाटतात.

गरोदरपणात काहीच खायची इच्छा होत नाही, अशीही प्रकरणे असतात. तर सर्वकाही खावंसं वाटत असेही जाणवते. पण, अनेकवेळा महिला असे सांगतात की, आम्ही तर त्या नऊ महिन्यात आवडत नसलेले आंबट पदार्थ, चिंचा,कैऱ्या खाल्ल्या. काही महिला तर सांगतात की आम्हाला दारू,बिडी पिण्याचे डोहाळे लागले होते.

Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?
Alia Bhatt चे डोहाळे जेवण,सोहोळ्यासाठी नीतू कपूर यांची खास अट चर्चेत...

आता तुम्ही बनवाबनवी चित्रपटातील लक्ष्यामामांनी अजरामर केलेलं स्त्रीपात्र पाहिलं असेल. त्यात असलेल्या पार्वतीला गरोदरपणात बिडी पिण्याचे डोहाळे लागले होते. त्याचे तिच्या घरमालकीणीलाही आश्चर्यच वाटले होते. आता अदिती सारंगधर हिने तिच्या गर्भावस्थेतील अनुभव शेअर केला आहे.

ती असं म्हणते की, मी माझ्या गरोदरपणात भारतीय पदार्थ खाल्लेच नाहीत. मी फक्त सॅलेड खायचे. आणि मला त्या काळात बियर पिण्याचेही डोहाळे लागले होते. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी दिवसातून दोन घोट बियरचे घ्यायचे.

Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?
Pregnancy Care Tips : गर्भारपणात आंबट पदार्थ खाण्याचे डोहाळे का लागतात?

आता यावरून महिलांना डोहाळे का लागतात. आणि डोहाळ्यात एखादाच पदार्थ जास्त खावा असं का वाटतं, याबद्दल आपण अधिक माहिती घेऊयात.

आईच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला काही पदार्थ खावेसे वाटतात. त्यामुळे त्याची इच्छा आईला होते, असे आपल्याच नाहीतर जगभरातील लोकांना वाटते. पण, तसं नाहीय.

एक जीव पोटात वाढतो तेव्हा प्रत्येक महिलेच्या शरीरात काही बदल होत असतात. ते बदल तिच्या मनातही होत असतात. खरं तर डोहाळे लागणे हे हार्मोन्सच्या बदलामुळे होते, असे शास्त्रज्ञ म्हणतात.

Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?
Marathi Actress: "मी प्रेग्नन्सीमध्ये बिअर प्यायचे, मला बिअरचे डोहाळे लागले होते...."; मराठमोळ्या अभिनेत्रीनं सांगितला प्रेग्नन्सीदरम्यानचा अनुभव

त्याचं दुसरं एक कारण असं सांगितलं जातं की, शरीरात ज्या गोष्टीची कमी असते त्या गोष्टी अधिक खाव्याश्या वाटतात. जसे, काही महिला माती, खडू,पेन्सिल खातात. तर त्यांच्यामध्ये कॅल्शियमची कमी असते.

भारतातील महिला आंबट पदार्थावर ताव मारतात. तर परदेशातील महिला भातापासून बनवलेले पदार्थ खात असतात. आपल्याकडे तर गरोदर स्त्रीचे डोहाळे पुरवण्यासाठी खास डोहाळेजेवणाचा कार्यक्रमही घेतला जातो. ज्यावेळी त्या स्त्रीला आवडणारा प्रत्येक पदार्थ तिला खायला दिला जातो.

घरातील वृद्ध आज्जी,आई असं म्हणतात की, महिलेचे डोहाळे पुरवलेच गेले पाहिजेत. नाहीतर बाळाची वाढ योग्य होत नाही.

डोहाळे लागले म्हणून खाल्ला जाणारा पदार्थ पोषक असतो का?

तसं नाही, एखादा पदार्थ जास्त खाल्ल्याने त्यातून जास्त पोषक तत्व मिळतात असं काही नाही. उलट ज्या महिलांना, तुपकट,तेलकट, फास्ट फूड खाण्याचे डोहाळे लागतात त्यांनी अति प्रमाणात ते खाल्ल्याने महिलांचे वजन वाढू शकते. केवळ वजन नाहीत गरोदरपणी होणारा थायरॉईड, कोलेस्टेरॉलमध्ये दुप्पट वाढ होऊ शकते.

Pregnancy Care : कोणाला बिडी तर कोणाला बियर.. ! ढुंकूनही न पाहिलेले पदार्थ खाण्याचे डोहाळे नेमके का बरे लागतात?
Vidya Balan: आलिया, बिपाशानंतर विद्याला 'डोहाळे': गुड न्युजची तयारी?

डोहाळ्यांबद्दलची मानसिक स्थिती काय असते?

गर्भावस्थेत एखादा पदार्थ खाण्याचा विचार मनात आला. तर, तो खाताना कसा लागेल, आंबट पदार्थ असेल तर तोंडाला पाणी सुटू शकतं. पण सतत त्याच पदार्थाचा विचार करून तो पदार्थ खायची तिव्र इच्छा होते. आणि एकदा खाऊनही मन शांत बसू देत नाही. त्यामुळे सतत तो पदार्थ आपल्या जीभेवर असावा, असा विचार महिला करू लागतात. त्यामुळेच डोहाळ्यांची स्थिती उद्भवते, असे संशोधक म्हणतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.