आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात आनंददायी भावना असते. पण गरोदरपणात महिलांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. गरोदरपणात अनेक महिलांना त्यांच्या पायात सूज येण्याच्या समस्येने त्रास होतो.
गरोदरपणात पाय सुजण्यामागे अनेक कारणे असू शकतात, जसे की जास्त वेळ एकाच स्थितीत बसणे, कॅफिनचे जास्त सेवन, मिठाचे जास्त सेवन, हार्मोनल बदल आणि तणाव, या गोष्टी यासाठी कारणीभूत ठरू शकतात. तसेच, काही औषधांची रिऍक्शन आल्यानेही पायांना सूज येते. (Pregnancy Care Tips)