Pregnancy Care Tips : गरोदरपणाच्या नऊ महिन्यात एखादा पदार्थ खूप आवडत असतो. कुणाला आंबट खायची इच्छा होते, तर कुणाला गोड. काही स्त्रियांना तर झणझणीत ठेचाच खावासा वाटतो. कुणाला गारेगार आईसक्रीम आवडतं, तर कुणाला एखाद्या विशिष्ट ब्रँडचं चॉकलेट.
पाणीपुरी, बर्फाचा गोळा अगदी कशाचेही डोहाळे लागू शकतात. इतकंच कशाला काही विचित्र आणि गमतीशीर डोहाळेसुद्धा असतात. काहींना माती, खडू, अगदी सिगारेटी ओढण्याचेही डोहाळे लागल्याचं तुम्ही ऐकलं असेल.
डोहाळे अगदी वेळी-अवेळी, अपरात्रीसुद्धा एखाद्या गरोदर बाईला काहीतरी खाण्याची अतीव इच्छा होते. मग नवरा दुकानांमध्ये चकरा मारून तो पदार्थ आणून देतो आणि ते खाल्यावर त्या स्त्रिला अगदी मनापासून तृप्ती मिळत असते.
गरोदरपणात महिलांच्या शरीरात अनेक शारीरिक आणि मानसिक बदल होतात. ज्याचा थेट परिणाम त्यांच्या आवडी-निवडीवरही होतो. त्यामुळे गरोदरपणात गरोदर महिलांना अनेक प्रकारच्या गोष्टी खाण्याची लालसा असते. पण बहुतेक गरोदर स्त्रिया या वेळी आंबट खाण्याची इच्छा व्यक्त करतात. यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? हेच जाणून घेऊया
हार्मोनल बदल
शरीरात हार्मोनल बदल होत असल्याने गरोदर महिलांना आंबट पदार्थ खावेसे वाटतात. ज्यामुळे महिलांना लोणचे ते चिंचेपर्यंत खाण्याची लालसा वाटू लागते. याशिवाय महिलांमध्ये आंबट अन्नाची ही लालसा गरोदरपणात कमी सोडियममुळेही असते. हेच कारण आहे की अनेकदा कच्च्या आंब्याचा सुगंध महिलांना या वेळी आपल्याकडे आकर्षित करतो.
गरोदरपणात आंबट पदार्थ खाण्याचे फायदे रोगप्रतिकारक शक्ती वाढते
आंबट पदार्थांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्याचे काम करते. लिंबू, कच्चा आंबा, आवळा किंवा लोणचे यासारख्या आंबट गोष्टी गर्भवती महिलेची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात. असे असले तरी त्याचे लोणचे खाण्यापूर्वी हे लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा लोणच्या-चटणीची लालसा असेल तेव्हा त्याचे जास्त सेवन करू नका. याशिवाय या वेळी बाजारातील लोणच्याऐवजी घरगुती लोणचे खाण्याचा प्रयत्न करा.
गॅसची समस्या कमी होते
लोणचे खाल्ल्याने गॅसच्या समस्येपासूनही आराम मिळतो. कारण लोणचे बनवताना कलौंजी, राई, हिंग, बडीशेप अशा अनेक प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. गरोदरपणात लोणच्याचे सेवन केल्याने शरीरातील खनिज घटकांचे संतुलन राखण्यास मदत होते. लोणच्यामध्ये असलेले बॅक्टेरिया गर्भवती महिलेच्या आतड्यात पोहोचून चांगले बॅक्टेरिया वाढविण्यास मदत करतात. यामुळे पचनक्रिया सुधारते आणि अपचन आणि चिडचिडेपणाची तक्रार दूर होते.
अशक्तपणा दूर होतो
बहुतेक भारतीय स्त्रिया अशक्तपणाची तक्रार करतात. अशावेळी गरोदरपणात चिंच खाल्ल्याने अॅनिमियाची समस्या दूर होऊ शकते, असे काही तज्ज्ञांचे मत आहे. चिंचेमध्ये असलेले कॅल्शियम लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि झिंक सारखे सूक्ष्म पोषक घटक हाडे आणि दात मजबूत ठेवण्याबरोबरच लोहाचा चांगला स्रोत देखील आहेत.
बद्धकोष्टतेपासून आराम मिळतो
गरोदर महिलांनी चिंचेचे सेवन केल्यास त्यांना बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळू शकतो. गरोदरपणात स्त्रियांना अनेकदा बद्धकोष्ठतेची तक्रार असते. अशावेळी चिंचेचे सेवन केल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होऊ शकते.
लोणच्याचे सेवन करताना या गोष्टी लक्षात ठेवा
गरोदर महिलांनी लोणच्याचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे.
लोणच्यात मीठ जास्त असल्याने रक्तदाबाची समस्या वाढू शकते.
याशिवाय गरोदरपणात कोणताही आहार घेण्यापूर्वी महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.