Priyanka Chopra : बॉलिवूड आणि हॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या ऑस्ट्रेलियामध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करतेय. या संदर्भातले अपडेट्स ती चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. 'द ब्लफ' या हॉलिवूड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये सध्या ती व्यस्त आहे. या दरम्यान तिने इन्स्टाग्रामवर तेथील काही फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत.
या शूटिंग दरम्यान तिच्या पायाला दुखापात झाल्याचे दिसून आले. त्यासाठी तिने चक्क पायाच्या तळव्याला लसणाच्या पाकळ्यांनी मसाज केला आहे. याचा एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
तिचा हा फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांना याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. लसूणाचे आयुर्वेदामध्ये अनेक औषधी गुणधर्म सांगण्यात आले आहेत. पायांच्या तळव्यांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज केल्यावर काय फायदे होतात? ते आज आपण जाणून घेणार आहोत.
पावसाळ्यात सगळीकडे पाणी साचते. या दिवसांमध्ये आपल्याला घराबाहेर ही पडावे लागते. त्यामुळे, पावसाशी वारंवार आपला संबंध येतो. या पाण्यामुळे पायांमध्ये बुरशीजन्य संसर्गाची समस्या वारंवार उद्भवते.
त्यामुळे, पायांमध्ये वेदना होणे, पू होणे, पायांमध्ये किंवा बोटांमध्ये चिखली होणे, सूज येणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीमध्ये पायांना लसूणाच्या पाकळ्या चोळल्याने आराम मिळू शकतो.
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे सर्दी-खोकला आणि तापाच्या समस्या निर्माण होतात. लहान मुलांना आणि वयोवृद्धांना याचा अधिक फटका बसतो. कारण, लहान मुले आणि वयोवृद्धांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.
त्यामुळे, ते लगेच या संसर्गांना बळी पडतात. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही पायांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज करू शकता. यामुळे, शरीराला उबदारपणा मिळतो आणि तुमचे थंडीमुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण होऊ शकते.
आजकाल कामाच्या अधिकच्या ताणामुळे शारिरीक अन् मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी लसूण फायदेशीर आहे.
हा ताण कमी करण्यासाठी आणि मानसिक शांतीसाठी तुम्ही पायांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज करू शकता. यामुळे, तुम्हाला तणावापासून आराम मिळू शकेल आणि तुमचे मानसिक-शारिरीक आरोग्य उत्तम राहू शकेल.
पायाच्या तळव्यांना लसूणाच्या पाकळ्यांनी मसाज केल्याने अंगदुखी, पायाची सूज आणि ताप कमी होण्यास मदत होते. शिवाय, शरीरातील रक्ताभिसरण वाढते आणि ऊबदारपणा निर्माण होतो. ज्यामुळे, पायांना आराम मिळतो आणि थंडीपासून बचाव होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.