Propose Day : प्रपोज केलंय अन् समोरच्याने थेट नकार दिला? मग काय कराल?

जर तुम्हाला नकार मिळाला तर तुम्ही तो नकार कसा पचवायचा? याविषयी जाणून घेऊया.
Propose Day
Propose Daysakal
Updated on

Propose Day : वॅलेंनटाईन वीक सुरू आहे. सगळीकडे प्रेमाचा माहोल आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीजवळ प्रेम व्यक्त करतयं. आज प्रपोज डे असल्याने अनेकजण आपल्या मनातल्या भावना बोलून दाखवेल. अनेकांचे प्रपोजल स्वीकारल्या जाईल पण काही लोकांना प्रपोज केल्यानंतर नकारही मिळू शकतो.

तुम्ही कोणाच्या तरी प्रेमात आहात पण त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नाही. अशा वेळी तो नकार पचवणं कठीण जातं. जर तुम्हाला नकार मिळाला तर तुम्ही तो नकार कसा पचवायचा? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (Propose Day when you get no to your proposal what should we do read story)

  • मुळात समोरच्या व्यक्तीवर तुमचं खूप प्रेम आहे पण त्या व्यक्तीचं तुमच्यावर प्रेम नाही. अशावेळी समोरचा व्यक्ती तुम्हाला नकार देतो. हा नकार पचवाचला खरं तर खूप मोठं मन लागतं.

  • नकार पचवताना त्या माझ्या भावना आहे आणि स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवा. मनाला ठामपणे सांगा की प्रत्येक आवडणारी गोष्ट मिळू शकत नाही.

  • जर तुम्हाला नकार मिळाला असेल तर खचून जाऊ नका. तुमच्यात काही दोष आहे, असं गृहीत धरू नका.

Propose Day
Rose Day 2024 : मुलींना गुलाब का आवडतो?
  • जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला नकार देतो तेव्हा तुमच्या मनात बरंच काही असतं. ते मनात साचवू नका. मित्रांसोबत मनमोकळेपणाने बोला.

  • एक नकार मिळाल्याने आयुष्य संपत नाही. त्यामुळे चुकीच्या मार्गाने जाऊ नका. आशावादी रहा. यापेक्षाही काही तरी सुंदर आणि छान तुमच्यासाठी आहे, हे लक्षात घ्या.

  • नकाराला पॉझिटिव्हली घ्या. त्यातून शिकण्याचा प्रयत्न करा. आपण कुठे कमी पडतोय, याचं आत्मपरीक्षण करा.

  • सर्वात महत्त्वाचं म्हणजे समोरच्या व्यक्तीने नकार दिला. तिच्या भावनांचा आदर करा आणि हसतमुखाने नकारला सामोरे जा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.