जीन्सची ‘जॉगर’ स्टाईल

फॅशन ट्रेंडमध्ये जीन्सचे आपले स्वतंत्र स्थान आहे. जीन्स ऑफिशिअल वेअर, कॅज्युएल वेअर म्हणून लोकप्रिय आहेत.
jeans jogger style fashion
jeans jogger style fashionSakal
Updated on

- पृथा वीर

फॅशन ट्रेंडमध्ये जीन्सचे आपले स्वतंत्र स्थान आहे. जीन्स ऑफिशिअल वेअर, कॅज्युएल वेअर म्हणून लोकप्रिय आहेत. जीन्स म्हणजे आत्मविश्वास. ट्रेंड बदलत असले तरीही जीन्स कालबाह्य झाली नाही. साधारण १८५१ पासून सुरू झालेला जीन्सचा प्रवास आजही लोकप्रिय आहे. यामध्ये कॉमन इंडिगो रंगांचे जीन्सचे चाहते सर्वाधिक असून सध्या जॉगर जीन्स आणि बॅगी जीन्स यांना खास मागणी आहे.

नीट न्याहाळले तर लक्षात येते, की जीन्ससोबत लॉंग कुर्ता, ए लाइन कुर्ता किंवा शॉर्ट-टॉप काहीही मॅच करता येतात. जीन्स व्यवस्थित हाताळता आली, तर जीन्ससारखा उत्तम फॅशन ट्रेंड नाही. कॉमन बेस कलर असलेले जीन्सचे काही प्रकार वर्षानुवर्षे लोकप्रिय आहे ते त्यांच्या फ्रेशनेसमुळे. पटकन खरेदी करता येणाऱ्या जीन्सचे सर्व प्रकार मॅच करणे अगदी सोपे काम. मोठमोठ्या ब्रॅँड्समध्ये जीन्सचा सिंपल ट्रेंड पाहायला मिळतो. सध्या जॉगर जीन्सचा ट्रेंड बघायला मिळतो. पायाशी जरा निमुळती असणारी ही जीन्स शॉर्ट टॉप, लॉंग स्लीव्हज टीशर्ट, शॉर्ट शर्टसोबत खूप छान दिसते.

जॉगर कॉटन फॅब्रिकपासून बनवला जातो. म्हणूनच ही जीन्स वजनदार वाटत नाही. शिवाय हिची फिटिंग उत्तम आहे. यात अनेक आकर्षक रंग आणि साइझचे पर्याय आहेत. टी-शर्ट किंवा शर्टसोबत पेअर करता आल्याने छटपट तयार व्हायचे असेल, तर जॉगर जीन्सचा पर्याय छान ठरतो आहे. जॉगर स्टाइल जीन्समध्ये पाच पॉकेट्स देण्यात आले असल्याने ही जीन्स अजूनच सुंदर दिसते. जॉगर जीन्स सेलिब्रिटींमध्येही लोकप्रिय आहे.

मोकळीढाकळी जीन्स म्हणजे बॅगी जीन्ससुद्धा बघायला मिळते. स्कीन टाईट जीन्सची जागा बॅगी जीन्सने घेतली आहे. या जीन्सच्या विशिष्ट फिटिंगमुळे ही जीन्स खूप आरामदायी वाटते. याही जीन्सवर बॅगी टॉप छान दिसते.

असे करा कॉंबिनेशन

जॉगर जीन्स वर्षभर ट्रेंडमध्ये असते. हिवाळ्यात केबल-निट स्वेटर आणि चंकी स्नीकर्स सोबत जॉगर जीन्स हा पर्याय आहे, उन्हाळ्यात क्रॉप टॉप आणि खुल्या पायाच्या सँडलसह जॉगर जीन्स उठून दिसतात.

गडद रंग निवडा

जॉगर डार्क रंगात खूप छान दिसतात. काळा, राखाडी, हिरवा, निळ्या किंवा गडद राखाडी या रंगांमध्ये स्वेट पँट कायमच उत्तम पर्याय आहेत. डार्क रंगामध्ये स्थूलत्व जाणवत नाही. डार्क रंगाशिवाय इतर रंग कॅरी करता येतात. फक्त या रंगाचे कपडे हाताळता यायला हवेत.

वेगवेगळे पर्याय

कार्यक्रम, औचित्य बघून जॉगर जीन्ससोबत वेगवेगळे पर्याय निवडता येतील. प्रवासात असाल, तर लॉंग स्लीव्हज टीशर्ट, स्वेट शर्ट छान दिसतात. ऑफिस किंवा कामाच्या इतर ठिकाणी प्लेन शॉर्ट शर्ट, लायनिंग, चेक्सचे शर्ट व जॉगरचा पर्याय आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.