Vehicle Care : गाडीत हे कागदपत्रं नसतील तर मिळणार नाही इन्शॉरन्स; भरावा लागेल दंड

काहीवेळा, सर्व कागदपत्रे असूनही, तुम्हाला केवळ पीयूसी प्रमाणपत्रामुळे चलान भरावे लागू शकते.
Vehicle Care
Vehicle Care google
Updated on

मुंबई : जर तुमच्याकडे खासगी वाहन असेल तर तुम्ही पीयूसी प्रमाणपत्राबद्दल ऐकले असेल. पीयूसी म्हणजे प्रदूषण नियंत्रणाखाली असल्याचे प्रमाणपत्र.

तुमच्या वाहनामुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात आहे आणि पर्यावरणाला हानिकारक नाही असे हे प्रमाणपत्र आहे. हे प्रमाणपत्र दर सहा महिन्यांनी नवीन तयार करावे लागेल. ( PUC certificate is compulsory for vehicles) हेही वाचा - नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

Vehicle Care
Women's Day : परगावात नोकरी करणाऱ्या महिलांना मुलांसह राहाण्यासाठी सरकार देणार जागा

पेट्रोल आणि डिझेलवर चालणाऱ्या सर्व वाहनांसाठी PUC प्रमाणपत्र अनिवार्य आहे. अपडेट न केल्यास पकड गेल्यानंतर दंड भरावा लागू शकतो. त्याचबरोबर गरज भासल्यास वाहनाच्या विम्याचा दावा करण्यातही अडचणी येऊ शकतात.

पीयूसी प्रमाणपत्र का महत्त्वाचे आहे ?

PUC प्रमाणपत्र हे तुमच्या वाहनासाठी अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज आहे. तुम्ही नेहमी अपडेटेड PUC सोबत ठेवावे. त्याच वेळी, आपण त्याचे नूतनीकरण करण्याची देखील काळजी घेतली पाहिजे.

काहीवेळा, सर्व कागदपत्रे असूनही, तुम्हाला केवळ पीयूसी प्रमाणपत्रामुळे चलान भरावे लागू शकते. जर तुम्ही पीयूसी प्रमाणपत्राशिवाय गाडी चालवताना पकडले गेला तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. कोणत्याही PUC केंद्रावरून हे प्रमाणपत्र तुम्हाला सहज मिळू शकते.

पीयूसी प्रमाणपत्रासाठी हे नियम आहेत

इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया (IRDAI) नुसार, तुमच्या वाहन विम्याचे नूतनीकरण करताना तुम्हाला वैध PUC प्रमाणपत्र द्यावे लागेल. कायद्यानुसार तुम्ही थर्ड पार्टी इन्शुरन्सशिवाय कोणतेही वाहन चालवू शकत नाही.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारित, IRDAI ने असा आदेश प्रसिद्ध केला आहे की पॉलिसी नूतनीकरणाच्या तारखेला वैध PUC प्रमाणपत्र असल्याशिवाय कोणतीही विमा कंपनी वाहनाचा विमा काढू शकत नाही.

Vehicle Care
Triwizard Chess : एकाच वेळी तिघांना खेळता येणार बुद्धिबळ; तिसऱ्या सोंगटीचा रंग कोणता ?

विमा दावा करण्याचे नियम काय आहेत ?

मोटार वाहन नियम १९८९ नुसार सर्वोच्च न्यायालयाने एका निर्णयात PUC अनिवार्य प्रमाणपत्र म्हणून घोषित केले आहे. त्याचवेळी IRDAI ने विमा कंपन्यांना आदेश दिले आहेत की ज्या वाहनांकडे PUC प्रमाणपत्र नाही त्यांचा विमा उतरवू नका.

मात्र, विम्याचा दावा करण्यासाठी या प्रमाणपत्राचे बंधन ठेवण्यात आलेले नाही. विम्याचे दावे सहजपणे निकाली काढण्यासाठी गेल्या वर्षी नवीन KYC नियम लागू करण्यात आला आहे. यानुसार, विमा दावा निकाली काढण्यासाठी पीयूसी प्रमाणपत्र असणे आवश्यक नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.