सुरेख संवादातून जोडा नाती

मी गेल्या दहा वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करते, यावेळी मला सर्वाधिक पाठिंबा व मानसिक आधार माझा नवरा देतो.
radha sagar relationship tips Build relationships through good communication
radha sagar relationship tips Build relationships through good communication sakal
Updated on
Summary

मी गेल्या दहा वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करते, यावेळी मला सर्वाधिक पाठिंबा व मानसिक आधार माझा नवरा देतो.

- राधा सागर

तुमचं नातं किती घट्ट आहे, एकमेकांवर तुमचा विश्वास किती आहे, तुम्ही एकमेकांना प्रत्येकवेळी गृहित नाही ना धरत, एकमेकांबद्दल तुमच्या मनात किती आदर व प्रेम आहे, तुम्ही समोरच्याला किती मान-सन्मान देता, या सर्व गोष्टींवर कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.

ज्यावेळी सुख आणि आनंदाच्या काळात एकत्र येतो, त्याचप्रमाणे वाईट वेळ येते किंवा परिस्थिती वाईट निर्माण होते, तेव्हा एकमेकांना आपण किती साथ देतो, यावरही कुटुंबव्यवस्था अवलंबून असते.

पती सागर कुलकर्णी मला सगळ्यात जवळचा आहे. तो माझा पती, मित्र अन् सगळंच आहे. आईही माझ्यावर प्रेम करते. तीही अर्थातच जवळची आहे. मी गेल्या दहा वर्षांपासून अभिनय क्षेत्रात काम करते, यावेळी मला सर्वाधिक पाठिंबा व मानसिक आधार माझा नवरा देतो. खरंतर तो आयटी कॉर्पोरेटमध्ये एचआर मॅनेजर आहे.

अभिनय क्षेत्रात काम करत असलेल्या बायकोला प्रोत्साहन देणं, तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गोष्टींचा तो त्याग करत आहे. मी पुण्याची आहे. काही वर्षं तो पुण्यात, तर मी मुंबईत राहत होते. मग मी अप-डाऊन करत होते. मग काही वर्षं तो मुंबईत आला. अशा खूप गोष्टी आहे, ज्यात त्याला कॉम्प्रमाइज करावं लागलं.

अभिनयातील जी स्वप्नं मी बघितली, ती पूर्ण करण्यासाठी तो सदैव माझ्या पाठीशी असतो. सासर व माहेरकडील लोकही माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, याचा मला खूप आनंद व अभिमान आहे. नाटक, चित्रपट वा मालिका यापैकी आपण कोणत्या माध्यमात काम करतो, त्यावर आपलं वेळेचं आणि कामांचं गणित ठरलेलं असतं. पूर्णवेळ कधीच काम नसतं, अशावेळी मला प्रेशर न टाकता तो नेहमीच मोटिव्हेट करत असतो.

आमच्या घरात कुणीही चिडलं, तर तो राग मनात कुणीही धरून ठेवत नाही. अनेकदा एकमेकांबद्दल मनात राग धरून ठेवला, तर त्या गोष्टी संपत नाहीत. अनेकदा गैरसमजही होतात. अशा वेळी नात्यांमध्ये संवाद ही गोष्टी खूप महत्त्वाची असते.

आमच्या कुटुंबाचं वैशिष्टय म्हणजे, कुणीही रागावलं तर लगेच समोरासमोर बोलतात. त्यामुळे नात्यात दुजाभाव निर्माण होत नाही. कुणाला काही अडचण आली, तर सर्वजण एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात.

माझ्या सासरी सर्व सणवार साजरे केले जातात. मात्र, अनेकदा चित्रीकरणामुळे मला घरी जाणं शक्य होत नाही; परंतु दिवाळी व गौरी-गणपती या दोन सणांना मी आवर्जून वेळ काढते. सर्वजण एकत्र येऊन धमाल करतो.

मोदक व फराळ तयार करून खायला घालणं मला खूप आवडतं. लॉकडाऊन काळात सासर व माहेरची मंडळी पुण्यात तर आम्ही मुंबईत होतो. आम्हाला पुण्यात येताही आलं नाही. नंतरचा काळ एकटा-एकटा वाटू लागला. घरातून बाहेरही पडता येत नव्हतं, त्यावेळी कुटुंबाची किंमत काय असते, हे माझ्यासह सर्वांनीच अनुभवलं आहे.

घरापासून आपण दूर राहतो, त्यावेळी घरी एखादा फोन करणं, ज्यावेळी सुटी मिळेल, तेव्हा आवर्जून घरी जाऊन कुटुंबीयांशी वेळ घालवणं, एकत्र जेवण करणं, गप्पा मारणं, फिरायला जाणं, एकमेकांना वेळ देणं, संवाद साधणं या गोष्टी नातेसंबंध चांगलं होण्यासाठी गरजेच्या असतात.

नाती दृढ होण्यासाठी....

  • तुम्ही तुमच्या पार्टनरला ॲप्रिशिएट करणं खूप गरजेचं असतं. त्यामुळे एकमेकांत प्रेम आणि विश्वास निर्माण होतो. त्यातून उभारी मिळते.

  • एकमेकांना गृहित धरू नका. अभिनयात तर सुटी मिळणं खूप अवघड असत. आजारी पडणंही शक्य नसतं. अशीच स्थिती अनेक क्षेत्रात असते. त्यामुळे गृहित धरून नियोजन करू नये.

  • शक्य असेल तेव्हा एकत्र येऊन संवाद साधावा. छोटीशी सहल काढून एकमेकांना वेळ दिलाच पाहिजे.

  • कधीकधी वेगवेगळ्या कारणांमुळे ताणतणाव येतो, अशा वेळी एकमेकांना पाठिंबा व प्रोत्साहन देणं खूप गरजेचं आहे.

  • तुमचं बॉडिंग किती स्ट्रॉग आहे, ही गोष्ट खूप गरजेची आहे. ‘मी आहे ना,’ एवढा एक शब्द खूप सपोर्ट देतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.