Radhika Merchant : मराठमोळी,थोडीशी साधीभोळी..गृहशांती पुजेला अंबानींच्या सुनेचा नथीचा नखरा एकदा बघाच..!

Anant-Radhika Wedding : राधिकालाही मराठमोळा नथीचा नखरा ट्राय करावा वाटला. त्यामुळेच तिने ग्रहशांती पूजेत चक्क मराठी लुक केला होता.
Radhika Merchant
Radhika Merchantesakal
Updated on

Radhika Merchant :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची तारीख जवळ आली आहे. ते मुंबईतील जिओ वर्ल्ड कॉन्वेंशन सेंटर मध्ये लग्नगाठ बांधणार आहेत. लग्नाच्या आधी अंबानी कुटुंबाकडून अनेक विधी पार पाडले जात आहेत. नुकतेच राधिकाने गृहशांती पूजा केली या दरम्यान तिने केलेला लुक बराच व्हायरल झाला आहे.

राधिकालाही मराठमोळा नथीचा नखरा ट्राय करावा वाटला. त्यामुळेच तिने ग्रहशांती पूजेत चक्क मराठी लुक केला होता. अगदी साधी भोळी मराठमोळी पोरगी अशीच ती दिसत होती. पांढऱ्या रंगाच्या साडी मध्ये तिने खास दागिने घातले होते. तिने नाकात चक्क नथ घातली होती. या तिच्या लुकची बरीच चर्चा होत आहे. (Anant-Radhika Wedding )

Radhika Merchant
Radhika Merchant: हिऱ्यांच्या दुनियेत जगणारी राधिका दिसली गनमेटल साडीत; Photo Viral

या कार्यक्रमासाठी राधिकाने गोल्डन काठ असलेली पांढऱ्या रंगाची साडी निवडली होती. तर मोकळ्या केसात तिने गजराही घातला होता. या कार्यक्रमासाठी राधिकाच्या बहिणीने लाल रंगाची घरचोला साडी नेसली होती. त्याच्यावर गोल्डन रंगाचा ब्लाउज घातला होता. आणि भरगच्च ज्वेलरी घातली होती.

अनंत अंबानी- राधिका मर्चंट यांच्या संगीत नाईट नंतर ग्रह शांती पूजेचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झालेत. नुकतीच राधिकाच्या घरी गृहशांती पूजा पार पडली.

Radhika Merchant
Anant & Radhika Sangeet : शाहरुखच्या 'दिवानगी' गाण्यावर थिरकला अंबानी परिवार ; ग्रँड संगीत सोहळ्याची होतेय चर्चा

7 जुलै रोजी शैला मर्चंट आणि वीरेन मर्चंट यांनी त्यांची मुलगी राधिकासाठी घरी ग्रहशांती पूजा केली. या खास प्रसंगी राधिकाने साडी परिधान केली होती. ज्यामध्ये ती खूप सुंदर आणि सालस दिसत आहे. राधिका मर्चंटने पुन्हा एकदा आपल्या साधेपणाने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अनंत आणि राधिका 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये लग्न करणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या विवाहाच्या दुसऱ्या दिवशी १३ जुलै रोजी शुभ आशीर्वाद सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर 14 जुलै रोजी रिसेप्शन होईल. तीन दिवस चालणारा हा कार्यक्रम अतिशय खास असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.