Rahul Gandhi : राहूल गांधींची विरोधी पक्ष नेतेपदी निवड, पांढऱ्या कुर्त्याने वेधले सर्वांचे लक्ष

Lok Sabha Speaker Election: संसदेत विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाल्यावर राहूल गांधी पहिल्यादांच पांढऱ्या कुर्त्यामध्ये दिसले. यामुळे संसदेत त्यांनी सर्वांचे लक्ष त्यांनी वेधले होते.
Rahul Gandhi
Rahul GandhiSakal

Rahul Gandhi Leader of Opposition : लोकसभा अध्यक्षपदासाठी सभागृहात निवडणूक पार पडली. यामध्ये भाजपचे सत्ताधारी एनडीएचे उमेदवार ओम बिर्ला हे निवडून आले आहेत . तसेच राहूल गांधी यांची विरोधीपक्ष नेते म्हणून निवड झाली आहे. राहूल गांधी नेहमी टि-शर्ट आणि पँटवर संसदेत येत असत.पण आज संसदेत पहिल्यादांच कुर्ता घालून आले होते. यामुळे सर्वांना त्यांनी लक्ष वेधले होते.

संसदेत यापुर्वी राहूल गांधी यांनी टि-शर्ट आणि पँटच परिधान केले आहे. पण यंदा त्यांनी पांंढऱ्या रंगाचा कुर्ता आणि चुरीदार घातला होता. यामुळे सर्वांचे त्यानी लक्ष वेधले होते.

ओम बिर्ला यांना १३ पक्षांनी पाठिंबा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यांच्याविरोधात इंडिया आघाडीचे उमेदवार के. सुरेश हे उमेदवार होते.

ओम बिर्ला यांना पंतप्रधान मोदी, लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजूजी यांनी अध्यक्षपदाच्या खुर्चीपर्यंत नेलं आणि विराजमान होण्याची विनंती केली. तसेच त्यांना हस्तांदोलन करत अभिनंदन केले. याचा व्हिडिओ वृत्तसंस्था एएनआयने एक्सवर शेअर केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com