Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 : लोकांनी नाकारलेल्या कोल्हापुरातल्या फासेपारध्यांना राजर्षी शाहूंनी माणसात आणलं!

फासेपारधी या आदिवासी जमातीतील माणसांना राजर्षी शाहूंनी बडोद्याला व्हराडी बनवून नेलं!
Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 : esakal
Updated on

 Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :

 जनतेचे राजे राजर्षी शाहू महाराज यांची आज जयंती आहे. महाराष्ट्राच्या सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात राजर्षि शाहू महाराजांचे स्थान फार वरच्या दर्जाचे आहे. इतर अनेक राज्यांत बहुसंख्य समाज हा दीर्घकाळ शिक्षण, राजकीय सत्ता, सामाजिक स्थान व प्रतिष्ठा यांपासून वंचित राहिला. पण पुरोगामी महाराष्ट्रात हे झाले नाही.

सर्व जातीच्या लोकांना एकत्र घेऊन राजर्षी शाहूंनी कोल्हापुरसह राज्याचा विकास केला. स्वत: महाराज असूनही फासेपारधी, माकडवाली जमात जी चार चौघात कधीच दिसायची नाही ती लोक त्यावेळी वाड्यावर दिसायची.

महाराज या लोकांना कधीच दुजाभावाची वागणूक द्यायचे नाहीत. इतकेच काय तर, या लोकांना व्हराडी बनवून त्यांनी बडोद्यालाही नेते होते. शाहू महाराजांचे या लोकांवर असलेले प्रेम याच्या काही घटना आहेत. त्या कोणत्या हे पाहुयात.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Rajarshi Shahu Bank : राजर्षी शाहू बँकेत आता व्हॉटसअप बॅंकिंगची सोय

प्रसंग पहिला

फासेपारधी, पारधी हे एका आदिवासी जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात.

राजर्षी शाहू महाराजांनी जंगली, भटक्या, गुन्हेगार अशा फासेपारध्यांना माणसात आणण्यात बरेच यश मिळाले होते. महाराजांनी निवडत फासेपारध्यांना पोलिसात दाखल केले होते. यापैकीच असलेले लाल्या व आखा हे फासेपारधी तर पोलिसमध्ये जमादाराच्या हुद्द्यांवर जाऊन पोहोचले होते.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
शाहू जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

कोल्हापुरातील लोक या फासेपारध्यांना जवळ करू लागले. परंतु कोल्हापूर सोडून बाहेरचे लोक अजूनही या जमातीकडे गुन्हेगार म्हणूनच पाहत होता. या बाहेरगावच्या लोकांच्या दृष्टिकोनात बदल व्हावा म्हणून महाराजांनी जंगलात वेगवेगळ्या कामांच्या निमित्त त्यांना दूर-दूर पाठवू लागले.

या दूरच्या ठिकाणी त्यांनी कोणी अटकाव करू जेत केले. म्हणून दिवाणसाहेबांच्या स्वाक्षरीचा दाखलापण त्यांना देण्यात येऊ लागला.

एक दिवस विजापूर जिल्ह्यात चोऱ्या-दरोडेखोरीला ऊत येऊन तेथील जनता हवालदिल झाल्यानंतर तेथील अनेक तक्रारी एक दिवस प्रत्यक्ष महाराजांच्या कानांवर घालण्यात आल्या. कोणत्याही गहण प्रश्नाला महाराजांकडे उत्तर असणारच. महाराजांनी ताबडतोब 'लाल्या' या फासेपारधी जमातीतील शिपायास बोलविणे पाठविले. 'लाल्या' धावतच आला. "हे बघ लाल्या, त्या विजापुरात चोऱ्या-दरोडे वाढलेले आहेत. तिथल्या पोलिसांना ते सापडेनात, तू आजच्या आज जा व त्या सर्व चोरांना, दरोडेखोरांना पकडून हजर कर."

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Rajarshi Shahu Jayanti: शाहू मिलचा नारळ फोडला अन् कोल्हापुरात कापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली

अशी महाराजांनी आज्ञा देताच, "जी" म्हणत लाल्या विजापूरला रवाना झाला. चोरी-दरोडे यांच्या सर्व पद्धतीवरून पुढचा पवित्रा घेऊन, अतिमेहनत घेऊन अखेर सर्व गुन्हेगारांना 'जेरबंद' करण्यात लाल्या पूर्ण यशस्वी झाला.

'लाल्या' ने काम फत्ते केले हे ऐकून, महाराजांना मनस्वी आनंद झाला. विजापूर जिल्हा पोलिसप्रमुखांनी लाल्याला रू. पंधराचे रोख बक्षीस देऊन कामगिरी फत्ते केल्याबद्दल कानडीतून एक सर्टिफिकेटपण दिले होते, परंतु यापेक्षा कोल्हापूरला परत आल्यानंतर महाराजांनी त्याच्या पाठीवर जी थाप मारली होती, ती थाप लाल्याला अखेरपर्यंत अधिक मोलाची वाटत होती.

प्रसंग दुसरा

फासेपारध्यांना महाराजांनी खूप प्रेम दिले होते. युवराज राजाराम महाराज यांच्या विवाहाप्रसंगी बडोद्याला एक संपूर्ण रेल्वे भरून माणसे नेली होती. या रेल्वेत फासेपारध्यांची अनेक कुटुंबेपण होती. हा सर्व लवाजमा बडोद्यात उत्तरल्यानंतर सयाजीराव गायकवाड महाराजांनी त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली होती.

वधुगृही हा विवाह समारंभ होणार होता. फासेपारध्यांवर वर पक्षाकडील लोकांच्या संरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आली. त्या वेळी गायकवाड महाराजांनी शाहू महाराजांकडून एक यादी मागविली की, टेबलावर जेवणारे किती ? पाटावर जेवणारे किती? सरदार-जहागीरदार किती? हुजरे, नोकर-चाकर किती ? अशा पद्धतीची यादी मागविली व प्रत्येकाचा दर्जा पण विचारला.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Shahu Bhawan : 'शाहू सांस्कृतिक'वर बड्या नेत्यांचा डोळा; 99 वर्षे कराराचा घाट, मॉल-बझारचे नियोजन

हे पाहताच महाराजांना क्रोध आला; परंतु क्रोधावर नियंत्रण ठेवण्यात महाराज निष्णात असल्यामुळे आपण या ठिकाणी विवाहासाठी आलो आहोत, ही जाण ठेवून आपल्या क्रोधामुळे कोणताही व्यत्यय निर्माण होऊ नये म्हणून महाराज शांत राहिले व अत्यंत नम्रपणे त्यांनी भोजनाचे आमंत्रण नाकारले व आपल्या मुक्कामावरच त्यांनी खास सोय केली. महाराजांनी आपल्या तळावर यथेच्छ मिष्टान्नाची सोय केली व सर्वांना स्वतः पुढाकार घेऊन जेवू घातले.

भोजनानंतर त्या सर्वांना विचारले, "काय रे. कसं काय जेवण झालंय." तसे सर्वजण एक सुरात म्हणाले, "लई झक्कास झालंय. असलं आम्ही कधी जेवलोच नव्हतो बघा." हे ऐकून महाराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.   

प्रसंग तीन

राजर्षी शाहू महाराजांनी जातीयतेवर कुठाराघात घालून, ती पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा चंग बांधून, त्याविरूद्ध जंग सुरू केले. हजारो वर्षानुवर्षे चालत आलेली जातीयता नष्ट करणे महाकठीण होते. तरीदेखील आपण अंगिकारलेले हे कर्म सोडावयाचे नाही, हा महाराजांचा दृढनिश्चय होता.

गीतेमध्ये मोक्ष मिळविण्याचे साधन म्हणून स्वकर्म सांगितले आहे, ते त्यांना मान्य होते. 'स्वकर्मकुसुमी त्यास पूजिता मोक्ष लाभतो.' हे स्वकर्म प्रत्येकाचे वेगवेगळे असू शकते. 'बहुजन हिताय बहुजन सुखाय' अशा पद्धतीचे महाराजांचे कर्म होते. समाजातील विविध मागासलेल्या जाती-जमातींना पुढे आणण्यासाठी महाराजांनी सर्वंकष प्रयत्न सुरू केला.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Shahu Bhawan : 'शाहू सांस्कृतिक'वर बड्या नेत्यांचा डोळा; 99 वर्षे कराराचा घाट, मॉल-बझारचे नियोजन

यातील 'फासे-पारधी' जमातीकडे महाराजांनी लक्ष द्यावयाचे ठरविले. आजपर्यंत या जमातीकडे कोणी लक्ष दिले नव्हते. पक्षांच्या शिकारी करणे अथवा चोऱ्यामाऱ्या करणे हा त्यांचा व्यवसाय जो बनला होता, त्यापासून या जमातीने दूर व्हावे म्हणून महाराजांनी त्यांना रोजगारधंदा उपलब्ध करून देण्यास सुरूवात केली.

काहींना आपले बॉडीगार्ड नेमले. महाराज स्वतःचे संरक्षण स्वतः करण्यास पूर्णतः सक्षम असतानादेखील या जमातीपैकी काहींना केवळ रोजगार उपलब्ध व्हावा, ह्या उदात्त हेतूने बॉडीगार्ड म्हणून नेमले. आंबेवाडी ते सोनतळी या रस्त्याच्या कामावर काही फासेपारध्यांना नेमले. त्यांच्यावर देखरेखीसाठी अब्दुल हवालदार हा मुकादम म्हणून नेमण्यात आला. तसेच रावसाहेब विठ्ठलराव देसाई यांची दर शुक्रवारी त्यांचा पगार करण्यास नेमणूक केली.

आठवड्याचा पगार त्यांच्या हातावर ठेवल्यानंतर प्रत्येकाला एक एक मापटे हरभरे दिले जात. हरभऱ्याचा खुराक हा गरीबाला बदामाप्रमाणे असतो. भिजलेले हरभरे सकाळी उतून खाऊन या मजुरांनी कामावर यावे, ही महाराजांची अपेक्षा होती, रस्त्याचे काम संपल्यानंतर सोनतळी कॅपवर विहीर खोदण्याचे काम सुरू होते.

येथील दगडातून निर्माण होत असलेल्या विहिरीला पाणी लागणार नाही हे माहीत असतानादेखील ७०-८० फासेपारध्यांना केवळ काम मिळते ही जाणीव ठेवून विहीर खुदाईचे काम सुरू केले. यातून बाहेर पडणाऱ्या दगडांतून बाजूबाजूला नवीन इ‌मारती बांधण्याचे नवे काम सुरू करून राहिलेल्या सर्व फासेपारध्यांना महाराजांनी काम दिले.  

त्यामुळे फासेपारध्यांच्या वागणुकीत आमूलाग्र बदल झाला. जनतेचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलू लागला.

एक दिवस महाराजांचा खडखडा सकाळच्या वेळी नव्या राजवाड्याकडे जाण्यासाठी सोनतळी कँपहून सुटला. नेहमीप्रमाणे या खडखड्यात दोन-तीन तः फासेपारधी बसले होते. खडखडा थोडे पुढे पंचगंगा फुलाजवळ जातो तोच कवी तलहरी हैदर येत असलेले महाराजांनी पाहिले.

Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 :
Rajarshi Shahu Maharaj Jayanti 2024 : डबघाईला आलेल्या किर्लोस्कर कंपनीला राजर्षी शाहूंच्या तोफांनी तारलं! नेमकं काय घडलं होतं?

तसा खडखडा थांबविण्याचा हुकूम दिला व कवींना आत घेण्यास फर्माविले. कवी फासेपारध्यांच्या शेजारी बसले. खडखडा चालू लागला. कधी एकदा नवा राजवाडा येतो व आपण खाली उतरतो, असे कवींना वाटू लागले. राजवाड्यात गेल्यानंतर कवी महाराजांना म्हणाले,

"महाराज, त्या फासेपारध्यांना संगती घेऊन कसे काय बसता?"

तसे महाराज म्हणाले, "का रे? ती काय माणसे नाहीत?"

त्यावर कवी म्हणाले, "तसे नव्हे महाराज, ही लोकं अंघोळ बिंघोळ करीत नाहीत, कपडे धूत नाहीत, त्यामुळे त्यांचा कुबट वास येतो, त्यांच्या शेजारी बसवत नाही म्हणून म्हणालो."

तसे महाराज समजावण्याच्या स्वरात म्हणाले, "अरे  आपला देह वरून जरी स्वच्छ असला तरी आत घाणच घाण नाही ? त्यांच्यात आज ना उद्या सुधारणा होईलच. म्हणून आज मी त्यांना लाथाडू ? नाही, एसे होणे नाही."

(संबंधित प्रसंग प्रा. नानासाहेब साळुखे यांच्या ‘शाहूंच्या आठवणी’ या पुस्तकातून घेण्यात आले आहेत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.