Raksha Bandhan 2023 : श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन किंवा राखी पौर्णिमा हा सण आहे. राखी पोर्णिमा म्हणजे 'रक्षाबंधन'. हा सण बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस. भावाचा उत्कर्ष व्हावा, आपल्या भावाने आपले रक्षण करावे, ही यामागची मंगल मनोकामना असते.
शास्त्रात सांगितल्यानुसार पुरुषाच्या उजव्या हाताच्या मनगटावर सुर्यनाडी व स्त्रीच्या डाव्या हाताच्या मनगटावर चंद्रनाडी असते. या सोबत मनगटावर असणाऱ्या तीन मानिबंध कंकन रेखा ही असतात या रेखा शास्त्रनुसार पुरूषाला १२० वर्षे व स्त्रीला १०८ वर्ष आयुष्य असते हे आयुष्य वाढावे व रक्षणासाठी होण्यासाठी हे रक्षाबंधन करतात.
रक्षाबंधनासाठी लाखो प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. त्यातील भावाला आवडेल अशी राखी बाजारातून घेऊन याल किंवा आणलीही असेल. पण, जेव्हा सगळ्याच गोष्टी ‘होम मेड’ होत आहेत तर मग राखीला का मागे ठेवायचं. तुमच्या भावासाठी होम मेड राखी बनवत असाल तर या आयडिया तुमच्या कामी येतील. (DIY eco friendly rakhis that you can easily make at home)
पेपर क्विलिंग राखी
राखीमध्ये वेगळं काही करायचं असेल तर क्विलिंग पेपरचे डिझाईन तुम्ही बनवू शकता. क्विलिंग पेपरमध्ये अनेक आकार बनवून त्याला तुम्ही वेगवेगळ्या कलरच्या क्विलिंगने राखी बनवू शकता.
भावाच्या नावाची रेझिन राखी
सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या रेझिनपासून तुम्ही राखी बनवू शकता. रेझिनपासून तुम्ही भावाच्या नावाची राखी बनवू शकता. तुमच्या भावाचं नाव लिहीलेलं असेल तर तो ती राखी ब्रेसलेट म्हणूनही वापरू शकतो. तसेच इतर मुलांमध्ये ही राखी उठूनही दिसेल. (Gifts)
फोटो राखी
तुम्हाला तुमच्या भावाला एखादं सरप्राईज द्यायचं असेल तर तुम्ही या राखीचा विचार करू शकता. भावासाठी त्याच्या फोटोचीच राखी बनवू शकाल. तुम्हाला हव्या त्या आकारात ती बनवता येईल. त्याला मोती, रूद्राक्ष यांची सजावटही करता येईल.
गोंड्याची राखी
वेगवेगळ्या रंगांचे धागे एकत्र करून त्यापासून तुम्ही गोंड्याची राखी बनवू शकता. या दोऱ्यांना एकत्रित बांधून तुम्ही आधी गोंडे बनवा. त्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे आणि रंगाचे गोंडे एकत्र करून राखी बनवू शकता. (Rakhi Designs)
तुमच्याकडे या कामासाठी फार वेळ नसेल तेव्हा तुम्ही साधी-सोपी ही राखी बनवू शकता. लोकरीच्या गोंड्यांपासून बनलेली राखी हातात अगदी साधी अन् सोबर दिसते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.