Raksha Bandhan 2023 : भावा बहिणीच्या नात्याचा आनंद द्विगुणीत करणारा रक्षाबंधनाचा सण उद्यावर येऊन ठेपला आहे. घराघरात राखी पौर्णिमेची तयारी जोरात सुरू आहे. श्रावणात येणाऱ्या पौर्णिमेला राखी आणि नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. यंदा ३० आणि ३१ ऑगस्ट या दिवशी पौर्णिमा साजरी होणार आहे.
श्रावणात येणाऱ्या या पौर्णिमेला एक खास महत्त्व आहे. या पौर्णिमेदिवशी सूर्य, बुध, गुरू, शुक्र आणि शनी हे पाच ग्रह मिळून महायोग घडवून आणणार आहेत. या पौर्णिमेला भद्राकाळाचेही सावट असणार आहे.
भद्राकाळात रक्षाबंधन साजरी केल्याने विघ्न निर्माण होईल, अशी भिती असल्याने भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधन साजरी करावी असा सल्ला ज्योतिष देतात. या काळात तुमच्याकडून काही नकळत झालेल्या चुका तुमच्या राशीला भारी पडू शकतात. त्यामुळेच या पवित्र सणादिवशी काही गोष्टी न करण्याचा सल्ला ज्योतिष शास्त्रात दिला आहे.
यंदाच्या रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट असल्याने तो ३० तारखेला संपूर्ण दिवस असणार आहे. त्यामुळे भद्राकाळ असे पर्यंत भावाला राखी बांधण्याची चूक करू नका. कारण, शास्त्रात अशी आख्यायिका आहे की, लंकाधिपती रावणाची बहिण शुर्पणखा हिने रावणाला भद्राकाळ सुरू असताना राखी बांधली होती. आणि त्याच वर्षी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला होता. (Raksha Bandhan 2023)
राखी बांधत असताना एका गोष्टीकडे खास लक्ष द्या. ती म्हणजे, भावाच्या हातावर राखी बांधताना बहिणीचे तोंड कोणत्या दिशेला येते. तर, ज्योतिषांच्या मते, बहिणीचा चेहरा दक्षिण-पश्चिम दिशेला असावा, तर भावाचे तोंड उत्तर पुर्व दिशेला असावे.
भावाला प्लास्टिकची, तुटलेली, अशुभ चिन्ह असलेली राखी कधीही बांधू नये. हिंदू धर्मात काळ्या रंगाला अपवित्र मानलं जातं. त्यामुळे भावाला काळ्या रंगाची राखी कधीच बांधू नये. अशी राखी बांधण्याला शास्त्रात कधीच मान्यता नसते. ते बहिण-भावाच्या नात्यासाठी एखादं संकट ओढावू शकतं असं म्हटलं जातं.
यंदाच्या राखीपौर्णिमेला भावानेही विशेष काळजी घ्यायला हवी. बहिणीला ओवाळणीसाठी काही भेटवस्तू देताना ती योग्य आहे का याचा विचार करावा. बहिणीला कोणतीही धारधार शस्त्र, किंवा एखादं हत्यार, काचेच्या वस्तू, रूमाल, चप्पल अशा गोष्टी भेट देऊ नयेत.
गिफ्ट बाबत विचार केला तर, बहिणीला तिला आवडणारी वस्तूच गिफ्ट द्या. एखादी वस्तू नाहीच सुचली तरी तिला ओवाळणी म्हणून पैसे देऊ शकता. ज्यामुळे तिला आवडेल ती वस्तू ती स्वत: घेईल.
सण-समारंभाला आपल्याकडे विषेश महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी शुभ रंग असलेलेच कपडे परिधान करावेत. काळा रंग सोडून तुम्ही कोणताही रंग घालू शकता. पण, सध्या काळ्या रंगावर कोणताही कॉम्बो चालतो म्हणून काहीही घातलं जातं. पण, राखी पौर्णिमेच्यादिवशी तसं करू नका. या दिवशी चुकूनही काळ्या रंगाचे कपडे घालू नका. काळ्या रंगाच्या वस्तू वापरू नका.
वर्षातून एक महिना असा असतो जेव्हा सर्वच हिंदू लोक महिनाभर मांसाहार करत नाहीत. राखी पौर्णिमाही श्रावणातच असते त्यामुळे कोणी मांसाहार करत नाही. पण, तरीह काही लोक श्रावण पाळत नाहीत. ते हमखास बहिणीकडे जाऊन मासांहारावर ताव मारतात. पण, काळजी घ्या या दिवशी चुकूनही मांसाहाराला हात लावू नका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.