Raksha Bandhan Gifts For Sister : भाऊ आणि बहिणीच्या अतूट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन होय. श्रावण महिन्यातील नारळी पौर्णिमेला हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा हा सण १९ ऑगस्टला (सोमवारी) देशभरात साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन हा सण बहिण-भावाच्या प्रेमाचे प्रतिक मानला जातो. या दिवशी बहिण आपल्या भावाच्या हातावर राखी बांधते. त्यानंतर, भाऊ तिला छानशी भेटवस्तू देतो.
यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला काय गिफ्ट द्यावे? असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्ही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स तिला भेट देऊ शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गॅजेट्सबद्दल सांगणार आहोत. जे तुम्ही रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट करू शकता. कोणते आहेत ते गिफ्ट ऑप्शन्स? चला तर मग जाणून घेऊयात.
फिटनेस बॅंड हे हेल्थ ट्रॅकिंग करण्यासाठी सर्वोत्तम मानले जाते. रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट करण्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. या फिटनेस बॅंडच्या मदतीने तुम्ही किती पावले चाललात? याची नोंद यासोबतच हृदयाचे ठोके, झोपेचे निरीक्षण इत्यादी गोष्टी तपासल्या जाऊ शकतात.
अशा स्थितीमध्ये बहिणीच्या उत्तम फिटनेससाठी उपयुक्त असणारे हे फिटनेस बॅंड तुम्ही तिला गिफ्ट करू शकता. ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवरून तुम्हाला हे गिफ्ट ऑर्डर करता येईल.
स्मार्टवॉच आजकाल चांगलेच ट्रेंडिंगमध्ये आहे. सध्या तरूणाईमध्ये याचीच चर्चा आहे. स्मार्टवॉच हे केवळ दिसायला स्टायलिश नाही तर अनेक ऑप्शन्स तुम्हाला देते.
जसे की, स्मार्ट वॉचमध्ये हेल्थ ट्रॅकिंग, नोटिफिकेशन्स आणि कॉलिंग यांसारख्या अनेक सुविधा तुम्हाला मिळतील. रक्षाबंधनला बहिणीला भेट देण्यासाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
जर तुमच्या बहिणीला संगीताची, गाण्यांची आणि नृत्याची आवड असेल तर, रक्षाबंधनला तुम्ही तिला स्मार्ट स्पिकर गिफ्ट करू शकता. हा एक चांगला पर्याय आहे.
स्मार्ट स्पिकरमध्ये अनेक प्रकारचे पर्याय आणि आकार उपलब्ध असून तुम्ही ऑनलाईन वेबसाईटवरून किंवा शोरूममधून स्मार्ट स्पिकर खरेदी करू शकता.
आजकाल सगळेच स्मार्टफोनचा वापर करतात. यंदाच्या रक्षाबंधनला बहिणीला गिफ्ट करण्यासाठी पॉवरबॅंक हा बेस्ट पर्याय आहे.
हे एक महत्वाचे गॅजेट असून ज्याद्वारे तुम्ही फोन कुठेही आणि केव्हाही चार्ज करू शकता. त्यामुळे, अशी भेटवस्तू मिळाल्यानंतर बहिणीला नक्कीच आनंद होईल. यात काही शंका नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.