Raksha Bandhan Beauty Tips: रक्षाबंधनला चमकदार त्वचा हवीय? मग आजपासून करा बदाम तेलाचा 'असा' वापर

Raksha Bandhan Beauty Tips: बदामाचे तेल त्वचेसाठी खुप फायदेशीर असते. पण त्याचा योग्य वापर करणे गरजेचे आहे.
Raksha Bandhan Beauty Skin:
Raksha Bandhan Beauty Skin:Sakal
Updated on

Raksha Bandhan Beauty Tips: यंदा रक्षाबंधन हा सण १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. या दिवशी तुम्हाला चमकदार त्वचा हवी असेल तर आजपासून बदाम तेलाचा वापर करायता सुरूवात करू शकता. कारण बदाम तेलामध्ये अनेक पोषक घटक असतात. हिवाळा, उन्हाळा आणि पावसाळ्यात देखील या तेलाचा वापर करू शकता. रोज झोपण्यापुर्वी बदाम तेलाने चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज करावी. चेहऱ्यावरचे डाग कमी होऊन चेहरा चमकदार दिसतो.

बदामामध्ये कोणते घटक असतात?

बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ए, ई, डी, कॅल्शियम, पोटॅशियम, जस्त, लोह, मँगनीज, फॉस्फरस आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड यासारखे अनेक पोषक घटक भरपूर असतात . बदाम तेलाचे हे सर्व गुणधर्म त्वचेच्या समस्यांवर उत्कृष्ट उपचार आहेत.

बदाम तेलाचा कसा वापर करावा

१) कोणत्याही मॉइश्चरायझिंग लोशनमध्ये बदामाचे तेल मिक्स करावे आणि झोपण्यापुर्वी चेहऱ्याला हलक्या हाताने मसाज करावी. रात्री झोपण्यापूर्वी बदामाचे तेल लावल्याने त्वचा चमकदार होते.

२) रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाने हलक्या हाताने मसाज करावी. यासाठी तेलाचे काही थेंब हातावर घ्यावे आणि थोडे घासावे यामुळे तेल गरम होईल आणि नंतर चेहऱ्यावर लावावे. तुम्हाला काही दिवसातच चेहरा चमकदार दिसेल.

Raksha Bandhan Beauty Skin:
Rakhi Gift Idea For Sister: यंदा रक्षाबंधनला कमी बजेटमध्ये बहीणीला देऊ शकता 'या' खास भेटवस्तू

बदाम तेल चेहऱ्यावर लावण्याचे फायदे

स्ट्रेच मार्क्स कमी होतात

बदाम तेल लावल्याने स्ट्रेच मार्क्स कमी होतात. कारण यामध्ये व्हिटॅमिन ई असते. तसेच चेहऱ्यावरचे डाग कमी करतात.

चमकदार त्वचा

बदाम तेलाचा नियमितपणे वापर केल्यास चेहरा चमकदार दिसतो. तसेच चेहरा हायड्रेट राहतो.

रक्ताभिसरण

बदाम तेलाने चेहऱ्यावर मसजा केल्याने रक्ताभिसरण सुरळित राहते. तसेच डेड स्किन कमी होतात.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.