Raksha Bandhan Makeup: आज देशभरात रक्षाबंधनचा उत्साह पाहायला मिळत आहे. मार्केट देखील मिठाई, राखीने सजली आहे. रक्षाबंधननिमित्त भावाच्या मनगटावर राखी बांधण्यासाठी बहिणी सकाळपासूनच तयारीला लागल्या आहेत. अनेक भाऊही सकाळी बहिणींच्या घरी जाण्यासाठी निघाले आहेत. राखीच्या दुकानांपासून ते मिठाईच्या दुकानांपर्यंत मोठी गर्दी असते.
प्रत्येक बहिणीसाठी हा खास सण आहे. जर तुम्हालाही राखीच्या दिवशी सर्वात सुंदर दिसायचे असेल तर मेकअप करताना काही गोष्टी लक्षात ठेवा. पावसाळा सुरू आहे.यामुळे मेकअप करताना चुक झाल्यास तुमचा लूक खराब होऊ शकतो.