How to use Jade Roller for Glowing Skin: रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. यंदा रक्षाबंधन १९ ऑगस्टला साजरा केला जाणार आहे. रक्षाबंधन सणाची प्रत्येक बहिण आतुरतेने वाट पाहत असते. या दिवशी बहिण आपल्या लाडक्या भावाला ओवाळते आणि मनगटावर राखी बांधते. तसेच भाऊ बहिणीला सुंदर आणि उपयुक्त भेटवस्तू देतो.
रक्षाबंधनला सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला महागडे फेशियल करतात, विविध मेकअप प्रोडक्ट वापरतात. पण तुम्हाला कमी वेळेत चेहऱ्यावर चमक हवी असेल तर जेड रोलरचा वापर करू शकता. सध्या स्किन केअर रूटीनमध्ये जेड रोलर वापरण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. पण जेड रोलर वापरल्याने त्वचेला कोणते फायदे होतात आणि त्याचा कसा वापर करावा हे सोप्या शब्दात जाणून घेऊया.