Raksha Bandhan 2024 : राखी पौर्णिमेवरील भद्राचे सावट टळले; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

Bhadrakal in Raksha Bandhan :राखी पौर्णिमेदिवशी भद्राकाळाचे संकट टळले असले तरी राहू काळ त्रासदायक आहे?
Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024esakal
Updated on

Raksha Bandhan 2024 :

कोणतंही काम करताना आपण मुहूर्त पाहतो. लग्न,मुंज,साखरपुडा, वास्तूशांत अशा प्रत्येक कार्यक्रमाला मुहूर्त साधावा लागतो. उद्या श्रावणातील पौर्णिमा आहे. या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते. पण गेल्या काही दिवसांपासून रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट असल्याचे सांगितले जाते.

पौर्णिमेदिवशी भद्राकाळ असल्याने त्याकाळात भावाला राखी बांधू नये असे सांगितले जाते. याआधीही भद्राकाळ येत होता आणि तो आल्यावर लोक कोणतंही शुभ काम केलं जात नाही. त्यामुळे भद्राकाळ नक्की काय आहे, लोक त्याला इतके का घाबरतात याबद्दल आज आपण जाणून घेऊयात. (Raksha Bandhan 2024)

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan Fashion Tips: रक्षाबंधनाला सुंदर दिसण्यासाठी हे फ्लोरल प्रिंट ड्रेस ट्राय करून पाहा, या प्रकारे करा स्टाईल

भद्राकाळ काय आहे?

पुराणात सांगितले जाते की, भद्रा ही सुर्यदेवांची मुलगी आणि शनिदेवांची बहिण आहे. भद्राचा शब्दश: अर्थ होतो की, ‘जगाचे कल्याण करणारी’. मग असे नाव असताना तिला घाबरण्याचे काय कारण असावे.( what is the bhadrakal)

जेव्हा भद्रा पृथ्वीलोकात असते तेव्हाही शुभ कामे केली जात नाहीत. भद्रेचा तापट स्वभाव नियंत्रणात रहावा म्हणूनच ब्रह्मदेवांनी तिला कालगणना आणि पंचांगचा प्रमुख भाग असलेल्या व्यष्टी करणमध्ये स्थान दिले आहे. भद्रेपासून लागलेले दोष दूर करण्यासाठी भद्रेचं व्रतही केलं जातं. हा काळ सुरू असताना शुभ काम, देवदर्शन, यात्रा अशा गोष्टींवरही भद्रेची छाया पडते आणि ते काम पूर्णत्वास जात नाही.

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan Skin Care: रक्षाबंधनला चेहऱ्यावर ग्लो हवाय? मग 'जेड रोलर'चा असा करा वापर

यावेळी नाही भद्राचे सावट?

19 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरी होणार आहे. पण हा संपूर्ण दिवस शुभ नाही. या दिवसावरती भद्रकाळाचे सावट आहे. हा काळ दुपारी 1.30 पर्यंत आहे. पण, यंदा चंद्र मकर राशीत आहे. त्यामुळे भद्रकाळ पाताळ लोकात असेल. त्यामुळे पृथ्वीवरील शुभ कामात याचा कुठलाही परिणाम होणार नाही. त्यामुळे, यंदा रक्षाबंधनावरती कुठलंही सावट असणार नाही.

रक्षाबंधनदिवशी कधी आहे राहूकाळ

रक्षाबंधनादिवशी राहुकाळ सुद्धा आहे. या दिवशी सकाळी ७ वाजून ३१ मिनिटांपासून सकाळी ९ वाजून ५ मिनिटांपर्यंत हा काळ असेल.

Raksha Bandhan 2024
Raksha Bandhan 2024: भावा-बहिणीच्या नात्यात या मुद्द्यांवर उडू शकतात खटके, आधीच काळजी घेतली तर नात्यातील गोडवा टिकेल

राखीसाठीचा शुभ मुहूर्त कोणता

पौर्णिमेदिवशी दुपारी १.४६ पासून ४.१९ मिनिटांपर्यतचा मुहूर्त शुभ आहे. तसेच, लोक प्रदोष काळातही राखी बांधू शकतात. प्रदोष काळ सायंकाळी ६.५६ पासून रात्री ९.७ पर्यंत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.