लहान भावाच्या मनगटावर बांधा Cartoon राखी; भाऊ होईल 'खुश'

Raksha Bandhan
Raksha Bandhanesakal
Updated on

Rakhi Festival 2021 : बहीण-भावासाठी सर्वात सुंदर असलेल्या 'रक्षाबंधन' सणाची जोरात तयारी सुरू झालीय. आज प्रत्येक बहीण तिच्या भावासाठी सुंदर आणि खास राखी शोधण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच, आपल्या घरातील सर्वात लहान आणि प्रिय भाऊ देखील त्याच्या खास राखीची वाट पाहत आहे.

Summary

बहीण-भावासाठी सर्वात सुंदर असलेल्या 'रक्षाबंधन' सणाची जोरात तयारी सुरू झालीय. आज प्रत्येक बहीण तिच्या भावासाठी सुंदर आणि खास राखी शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

बहीण-भावाचे अतुट नाते अधिक वृद्धिंगत करणारा सण म्हणजे, राखी पौर्णिमा. आज या सणानिमित्ताने डायमंड, स्टोन, मोती राखी यासह विविध प्रकारच्या रंगीबेरंगी राख्यांनी बाजार फुलला आहे. यावर्षी अनेक नवे ट्रेंड राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. लहान मुलांच्या आवडत्या गोष्टींबद्दल बोलायचं झालं, तर पहिली गोष्ट 'कार्टून' पात्रांपासून सुरू होते. कार्टून आणि खेळण्यांमुळं मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळच समाधान पहायला मिळतं. म्हणून, जर हे 'रक्षाबंधन' तुम्हाला देखील खास बनवायचं असेल, तुमच्या घरातील लहान भावाच्या चेहऱ्यावर आनंद फुलवायचं असेल, तर यावेळी तुमच्या भावाच्या मनगटाला खास कार्टून आणि खेळण्यांच्या राख्यांनी सजवा, यामुळे तुमचा भाऊ जाम खुश होईल..

Raksha Bandhan
'रक्षाबंधन' कधी आहे माहितीय? जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त

बच्चे कंपनीसाठी खास राखी

बच्चे कंपनींना आवडणारे कार्टुन, हिरो आदींचे चित्र असलेल्या विविध प्रकारच्या राख्यांनी बाजार सजला आहे. यात Cartoons मध्ये डोरेमॉन, मोटू-पतलू, मिकी माऊस, छोटा भीम, सिनचेन, लिटल सिंघम यासह म्युझिक व लाईट असलेल्या असंख्य प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांचा फ्रेंड क्यूट गणेशा आणि कृष्णा राखी देखील विशेषतः मुलांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलीय. म्हणून, जर तुम्हाला तुमच्या लहान भावाच्या चेहऱ्यावर एक मोठं हास्य आणायचं असेल, तर या रक्षाबंधननिमित्त तुमच्या भावाच्या मनगटावर 'खास' राखी बांधा.

chota bheem rakhi
chota bheem rakhi
Raksha Bandhan
शहीद जवानाच्या पत्नीनं पाठवल्या मराठा बटालियनला 'राख्या'

युनिकॉर्न राखी (Unicorn Rakhi)

आपण लहान भावांना राख्यांसह 'या' भेटवस्तू देखील देऊ शकता..

  1. आर्ट क्राफ्ट कलर्स

  2. चॉकलेट

  3. अॅनिमल टॉयज

  4. कार्टून रिस्ट वॉच

  5. टेंट हाउस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.