कंडोमवर लागली चक्क ४६ हजारांची बोली; जाणून घ्या त्यामागचं कारण

कंडोमवर लागली चक्क ४६ हजारांची बोली; जाणून घ्या त्यामागचं कारण
Updated on

लिलाव हा शब्द कोणालाही नवा नाही. ऐतिहासिक वस्तूंपासून ते भाज्यांपर्यंत आजवर अनेक गोष्टींचा लिलाव झाल्याचं आपण पाहिलं आहे. परंतु, कधी कंडोमचा लिलाव झाल्याचं ऐकलं आहे का? अर्थात नाही. कुटुंब नियोजन किंवा लैंगिक आजार टाळण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कंडोमविषयी नागरिक अत्यंत दबक्या आवाजात चर्चा करत असतात. परंतु, गर्भनिरोधक म्हणून वापरण्यात येणाऱ्या याच वस्तूचा चक्क लिलाव करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या कंडोमसाठी चक्क हजारो रुपयांची बोली लागल्याचं पाहायला मिळालं.

सध्या सोशल मीडियावर एका दुर्मिळ कंडोमची चर्चा रंगली असून हे कंडोम २००वर्ष जुनं असल्याचं सांगण्यात येत आहे.  जवळपास १८ व्या- १९ व्या शतकात हे कंडोम तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे हे कंडोम खरेदी करण्यासाठी खरेदीदारांमध्ये चढाओढ लागली होती.

काही दिवसांपूर्वी कॅटाविकी (Catawiki ) संकेतस्थळावर या दुर्मिळ कंडोमचा ऑनलाइन लिलाव करण्यात आला. या लिलावात हे कंडोम घेण्यासाठी अनेकांनी हजारो रुपयांची बोली लावली होती. अखेर ४६ हजार रुपयांना तो विकला गेला. हे कंडोम फ्रान्समध्ये सापडलं.

काय आहे या कंडोमचं वैशिष्ट्य

४६ हजारांना विकला गेलेला हा कंडोम २०० वर्ष जुना असून तो मेंढीच्या कातड्यापासून तयार करण्यात आलं आहे. १८-१९ व्या शतकात मेंढी, डुक्कर, गाय आणि बकरी यांच्या कातड्यांपासून कंडोम तयार करण्यात येत होते. हे कंडोम त्या काळीही महाग असल्यामुळे याचा वापर केवळ श्रीमंत व्यक्तीच करत असतं. मात्र, कालांतराने अत्याधुनिक पद्धतीने कंडोम तयार करण्यात आल्यामुळे कातड्यांपासून तयार करण्यात येणाऱ्या कंडोमची मागणी घटली व हळूहळू ते नामशेष होऊ लागले.तसंच हे कंडोम आता दिवसेंदिवस दुर्मिळ होत चाललं असून काही निवड वस्तूसंग्रहालयांमध्येच ते ठेवण्यात आला आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.