Rashmika Mandanna : रश्मिकाने नेसली कुर्गी साडी, सर्व साड्यांमध्ये ही साडी का आहे खास?

Rashmika Mandanna in Coorgi saree : बॉलिवूडसारख्या ग्लॅमरस इंडस्ट्रीत येऊनही रश्मिका तिचे कल्चर विसरलेली नाही
Rashmika Mandanna
Rashmika Mandannaesakal
Updated on

shmika Mandanna :

बॉलिवूड- साऊथ सारख्या ग्लॅमरस इंडस्ट्रीत येऊनही रश्मिका मंदाना तिचे कल्चर विसरलेली नाही. त्यामुळे ती अनेकदा ट्रॅडिशनल साड्यांमध्ये दिसून येते. नुकतेच एका लग्नात तिने वेगळ्या पद्धतीची साडी नेसली होती. ती साडी अन् साडी नेसण्याची स्टाईल सध्या चर्चेत आहे.

रश्मिकाने कुर्गी स्टाईल साडी नेसली होती. ज्याला कोडागु स्टाइल ड्रेपिंग साडी असेही म्हणतात. ही पिवळसर हिरव्या रंगाची रेशमी साडी तिच्यावर खुलून दिसत होती. या साडीवर रश्मिकाने सोनेरी स्लिवसेल ब्लाऊज घातला होता. (Rashmika Mandanna)

Rashmika Mandanna
Rashmika Viral Video : रश्मिकाचा 'तो' व्हिडिओ, अमिताभ बच्चन यांचा संताप! 'कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी', नेमकं घडलं काय?

रश्मिकाने अलीकडेच एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. रश्मिकाने ज्या पद्धतीची ही साडी नेसली होती. त्या साडीची अन् स्टाईलची एक खास ओळख आहे. या साडीला कुर्गी साडी म्हणतात.

कुर्ग हे ठिकाण कर्नाटकातील डोंगराळ भागात आहे. कुर्ग हे ठिकाण शहरी वातावरणापासून दूर आहे. इथे मोबाईलला रेंज नसते पण निसर्गाची रेंज मात्र फुल्ल असते. कुर्गमध्ये पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. इथल्या महिला अशाच कुर्गी साडी नेसतात. ज्या त्यांना कामात आरामदायक वाटतात.

Rashmika Mandanna
Rashmika Mmandanna: हिरवी साडी, भरगच्च दागिने, अखेर समोर आला श्रीवल्लीचा 'पुष्पा 2' मधील लूक

इथे मसाले अन् चहाचे मळे प्रसिद्ध आहेत. इथल्या शेतात जाताना महिलांना पदर सांभाळणे जड जाऊ नये यासाठी ही साडी बनवली गेली असावी असा अंदाज आहे. कारण या साडीचा पदर खांद्यावर नसतो. तर तो संपूर्ण शरीराला साडी गुंडाळून मागून उजव्या खांद्यावर लावलेला असतो.

तसेच या साडीवर डोक्यावर स्कार्फ बांधण्याची प्रथाही आहे. अशी ही कुर्गीमधील कुर्गी साडी प्रसिद्ध आहे. अन् आता या साडीने रश्मिकालाही वेड लावले आहे.

Rashmika Mandanna
Rashmika Mamdanna: 'मृत्यूच्या दाढेतून वाचले', फ्लाईटच्या इमर्जन्सी लँडिंगनंतर रश्मिकाने सोडला सुटकेचा निःश्वास; नेमकं काय घडलं?

रश्मिका या साडी नेसण्याच्या पद्धतीची फॅन आहे. केवळ मैत्रिणीच्या लग्नात नाही तर अनेक कार्यक्रमांत तिने वेगळ्या पॅटर्नच्या साड्या वेगळ्या पद्धतीने नेसल्या आहेत.

कुर्गी स्त्रिया कोडगू शैलीत साडी नेसतात याचे एक ऐतिहासिक कारण म्हणजे ते कुर्गच्या डोंगर उतारावर त्या सहज फिरू शकतात. अशी साडी नेसून पदर सांभाळत बसावा लागत नाही, तसेच यातून साधेपणा दिसतो, असा तिथल्या महिलांचा समज आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.