रतन टाटा हे शतकातील एक महान उद्योगपती होते. त्यांनी १९९० पासून २०१२ पर्यंत टाटा उद्योग समूहाच्या अध्यक्षपदाची भूमिका बजावली. रात्री म्हणजे ९ ऑक्टोबरला मुंबईतील ब्रीच कॅन्डी रूग्णालयात रतन टाटा यांचे रक्तदाब कमी झाल्याने निधन झाले.
एक उत्तम उद्योगपती असण्यासोबतच टाटा त्यांच्या फिटनेस आणि आहाराबाबतही खूप जागरूक होते. रतन टाटा यांचा आहार आणि फिटनेस रूटीन प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या आरोग्याची आणि फिटनेसची काळजी घेण्यासाठी प्रेरित करते.
रतन टाटा त्यांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी त्यांचा आहार आणि व्यायाम नियमितपणे करत असत. त्यामुळे म्हातारपणातही ते एक्टीव्ह होते. अशा या महान व्यक्तिमत्त्वाच्या चांगल्या सवयी तुमच्या जीवनात अंगीकारून एक चांगले फिनेस राखू शकता.
आपण आठ तासाची ड्युटी केली तरी म्हणतो की आपल्याला व्यायामाला वेळ मिळत नाही. तर इतके मोठे व्यवसाय सांभाळणारा व्यावसायिक ते मात्र डायटच्या बाबतीत आणि व्यायामाच्या बाबतीत सजग होते. (Ratan Tata Fitness)
रतन टाटा व्यायाम आणि त्यांच्या चांगल्या आरोग्यदायी सवयींसाठी वेळ काढायचे. तुम्हीही त्यांच्या काही चांगल्या सवयी स्वतःला लावून घेऊन वर्क टेन्शन, तणाव यापासून दूर राहू शकता.
सध्या धावत जाऊन रेल्वे पकडायचे म्हणून लोकं लवकर उठतात. पण एखाद्या वेळेस व्यायामासाठी उठा म्हटलं तर त्यांना जमत नाही. उलट सुट्टीच्या दिवशी ते अधिक वेळा लोळत पडतात. पण टाटा तसे नव्हते ते सकाळी सहा वाजल्यापासूनच त्यांच्या दिवसाची सुरुवात करायची.
सकाळी लवकर उठून रतन टाटा मॉर्निंग वॉक करायचे. आठ ते दहा तास आपण जेव्हा झोपून उठतो तेव्हा आपल्या शरीराला बसून राहण्याची नाहीतर चालण्याची गरज असते. त्यामुळेच रतन टाटा नियमित वॉकिंग करायचे. त्याचबरोबर ते सूर्यनमस्कार आणि काही सोप्या आसनांचा सरावही करायचे.
भारतीय आयुर्वेदाने आपल्याला ध्यान हा सोपा मंत्र दिलाय. ध्यानाने आपला तणाव दूर होतो तर इतरही फायदे होतात. आपण एखाद्या निर्णयावरती शांतपणे विचार करू शकतो. त्यामुळेच रतन टाटा इतके यशस्वी होऊ शकलेत. रतन टाटा सकाळी ३० मिनिटांपर्यंत मेडिटेशन करायचे. याचा त्यांना खूप फायदा झाला
आपल्या आतड्यांचे कार्य सुरळीत ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांची योग्य हालचाल केली पाहिजे. श्वसनाच्या व्यायामांनी आतड्यांचे आरोग्य व्यवस्थित राहते. त्यामुळे रतन टाटा श्वसनाचे व्यायाम करायचे. आणि स्टिचिंग, असे सोपे व्यायाम सुद्धा करायचं.
नाश्ता - रतन टाटा यांना एक ग्लास ताज्या फळांचा ज्यूस, उकडलेले अंडे, अक्रोड आणि मनुका यांसारखे ड्राय फ्रूट्स नाश्त्यामध्ये खायचे.
दुपारचे जेवण: रतन टाटा यांना दुपारच्या जेवणात कधी कधी लसणाची फोडणी असलेली डाळ-चपाती आणि भात खाण्याची सवय होती. त्यांना घरी बनवलेले साधे आणि पौष्टिक अन्न खायला आवडायचे.यासोबत त्यांना दुपारच्या जेवणात भाज्यांची कोशिंबीर खायला आवडायची.
संध्याकाळी त्यांना कस्टर्डसह भरपूर ताजी फळे खायला आवडायची. ते शरीरासाठी खूप फायदेशीर असतात.
रात्रीचे जेवण: रतन टाटा यांना त्यांच्या रात्रीच्या जेवणात हलके अन्न आवडत असे. त्यांना रात्री सूप प्यायला आवडायचे आणि कधी कधी वाटाणा पुलाव खायलाही आवडायचे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.