Maharashtra Tourist Places : निसर्गरम्य किनारे अन् हिरवीगार वने.. नेचर लव्हर्सना फिरण्यासाठी बेस्ट आहेत रत्नागिरीमधील ही ठिकाणं

नेचर लव्हर्सना फिरण्यासाठी बेस्ट आहेत रत्नागिरीमधील ही ठिकाणं...
Maharashtra Tourist Places : निसर्गरम्य किनारे अन् हिरवीगार वने.. नेचर लव्हर्सना फिरण्यासाठी बेस्ट आहेत रत्नागिरीमधील ही ठिकाणं
Updated on

महाराष्ट्रातील रत्नागिरी हे केवळ आंबा आणि मत्स्य उत्पादनासाठी प्रसिद्ध नाही तर भेट देण्याचे उत्तम ठिकाण आहे. विविध प्रकारची औषधी झाडे, समुद्रकिनारे आणि आजूबाजूच्या वनस्पती या ठिकाणाच्या सौंदर्यात भर घालतात.

महाराष्ट्रातील कोकण भागात वसलेले रत्नागिरी हे एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला पर्वतांनी वेढलेले आहे. वर्षातील बहुतेक महिन्यांत येथील हवामान आल्हाददायक असते. रत्नागिरीमध्ये निसर्गप्रेमींसाठी अनेक पर्याय आहेत, पण तुम्हाला भारताचा समृद्ध इतिहास जाणून घेण्यात रस असेल, तर हे ठिकाण त्या दृष्टीनेही खास आहे.

गणपतीपुळे

गणपतीपुळे हे कोकण विभागातील रत्नागिरी जिल्ह्यात वसलेले एक छोटे शहर आहे. गणपतीपुळे गाव हे 400 वर्षे जुन्या गणेश मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. या सर्व गोष्टींशिवाय, येथे येणारे पर्यटक वॉटर स्पोर्ट्स अ‍ॅक्टिविटीजचा आनंद घेतात. एकंदरीत गणपतीपुळे हे असे पर्यटन स्थळ आहे की ज्याला मित्रपरिवार, सहकुटुंब भेट देता येते.

Maharashtra Tourist Places : निसर्गरम्य किनारे अन् हिरवीगार वने.. नेचर लव्हर्सना फिरण्यासाठी बेस्ट आहेत रत्नागिरीमधील ही ठिकाणं
Valentine Week : व्हॅलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी पुण्याजवळील ही ठिकाणं आहेत बेस्ट, जाणून घ्या

आरे-वारे बीच

कोकणात अनेक प्रसिद्ध समुद्रकिनारे आहेत. आरे-वारे हा जुळा समुद्रकिनारा आहे. एका बाजूला आरे बीच आहे मध्यभागी एक पूल आहे आणि दुसऱ्या बाजूला वारे बीच आहे. समुद्रकिनाऱ्यावर काही ठिकाणी काळी वाळू तर काही ठिकाणी पांढरी वाळू आणि सर्वत्र पामची झाडे आहेत. जे त्याचे सौंदर्य द्विगुणित करते. हा बीच खूप स्वच्छ आहे.

रत्नदुर्ग किल्ला

रत्नदुर्ग किल्ला हा रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या दोन ते तीन किलो मीटर अंतरावर आहे. रत्नागिरी शहरात फिरायला येणाऱ्या पर्यटकांसाठी रत्‍नदुर्ग किल्ला हा मुख्य आकर्षण आहे. या किल्ल्याच्या आग्रेय दिशेला जमीन आहे. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे. 120 एकर क्षेत्रफळावर पसरलेला हा किल्ला अतिशय सुदंर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.