Raw Egg Side Effects : अंडी खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे हे सर्वांनाच माहीत आहे, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ते योग्य प्रकारे कसे खावे? बरेच लोक अंडी कच्चे खातात, जर तुम्ही देखील त्यापैकी एक असाल तर तुम्हाला माहित असेलच की कच्चे अंडे का खाऊ नये.
कच्च्या अंड्यांमध्ये असणारे बॅक्टेरिया हे याचे प्रमुख कारण आहे. हे बॅक्टेरिया तुम्हाला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे अंडी शिजवून खाणे चांगले. कच्च्या अंड्यांपेक्षा शिजवलेली अंडी पचनासाठी चांगली असतात. कच्ची अंडी सहज पचत नाहीत.
अंड्यातील पिवळा आणि पांढरा भाग मिळून एक पूर्णान्न आहे असे मानतात. अंड्यामध्ये खालील घटक असतात,
· पोषक फॅट्स.
· HDL कोलेस्टेरॉल.
· प्रोटीन.
· अमिनो ऍसिडस्.
· व्हिटॅमिन A, B5, B12, D, E.
· Essential oils.
अनेकांना अंड्यांचा वासही आवडत नाही. पण काही लोक अशा प्रकारे आहारात अंड्यांचा समावेश करतात. तुम्हीही ही कच्चे अंडे खात असाल तर त्याचे परिणाम काय आहेत हे आधी जाणून घेतले पाहिजेत.
जर तुम्ही कच्चे अंडे खात असाल तर शिजवलेल्या अंड्याच्या तुलनेत कमी फायदा होतो. कच्च्या अंड्यातील एकूण प्रथिनांपैकी तुम्ही फक्त ५१% शोषून घेतो, तर शिजवल्यावर तुमच्या शरीराला ९१% प्रथिने मिळतात.
बायोटिन नावाचे विशेष पोषक तत्व कच्च्या अंड्यांमध्ये देखील आढळत नाही, ज्याला बी-7 किंवा व्हिटॅमिन एच देखील म्हणतात. हे चयापचय प्रक्रियेसाठी आवश्यक आहे.
कधी कधी कच्चे अंडे खाल्ल्याने उलट्या, मळमळ, अंगावर पुरळ येणे, सूज येणे इत्यादी समस्या उद्भवतात. तर शिजवलेले अंडे खाल्ल्याने तुम्ही या सर्व गोष्टी टाळू शकता.
अंडे पूर्ण उकडलेले खावे?
कच्चे अंडे खाण्याचे दुष्परिणाम पाहता अंडे योग्य प्रकारे शिजवून खाल्लेले चांगले असते, असेच म्हणावे लागेत. अंडे शिजवण्यासाठी कमीत कमी तेलाचा वापर करावा. अंडे जास्त शिजवू नये, अन्यथा यातील पोषक तत्त्व घटण्याची शक्यता असते. सकाळी नाश्त्यामध्ये, रात्रीच्या जेवणानंतर किंवा वर्कआउट नंतर उकडलेले अंडे किंवा ऑम्लेटचं सेवन करू शकता.
अंडे कधी खावे
शरीर निरोगी राहण्यासाठी कित्येक प्रकारच्या पोषण तत्त्वांची आवश्यकता असते. या पोषण तत्त्वांची आवश्यकता आपण आहाराच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो. अंड्याच्या सेवनामुळे शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होण्यास मदत मिळते. सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडे खाणे अतिशय लाभदायक असते.
वर्कआउट केल्यानंतर खूप भूक लागते. अशा वेळेस अंडे खाणे शरीरासाठी लाभदायक ठरू शकते. भूक शांत करण्यासाठी, शरीराला ऊर्जा देण्यासाठी आणि स्नायू -पेशी दुरुस्त करण्यासाठी अंड्यातील पोषक घटकांची भरपूर मदत मिळते. काही अभ्यासातील माहितीनुसार, रात्रीच्या जेवणानंतर अंडे खाणे हा एक पौष्टिक पर्याय आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.