ए सखे, तुझे पैसे गुंतविण्याचे हे आहेत की ग मार्ग

आलेला पैसा गुंतवण्याची सवय लावली की आपलाच पैसा साठून राहतो
women investment
women investmentgoogle
Updated on

महिलांनी योग्य मार्गाने पैसे गुंतविणे खूप गरजेचे असते. आजच्या युगात महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणे हे केव्हाही चांगलेच. आपण कमावितो कशासाठी तर, पोटासाठी. पण पोटाबरोबरच भविष्यासाठी योग्य तरतूद करणे,खूप महत्वाचे ठरते. पैसा समोर दिसला की त्याला पाय फूटतात. नव्या गोष्टी घेण्याची इच्छा बळावते. अशावेळी किती खर्च केला जातो त्याचे भान राहत नाही. म्हणून आलेला पैसा गुंतवण्याची सवय लावली की आपलाच पैसा साठून राहतो. मात्र तो योग्य ठिकाणी गुंतवणे गरजेचे आहे.तरच उत्तम परतावा मिळू शकतो. त्यासाठी अनेक पर्याय आहेत. त्या पर्यायांचा विचार करून, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पैसे गुंतविणे सुरू करणे गरजेचे आहे. तुम्ही अशा काही पद्धतीने गुंतवणूक करू शकता.

women investment
ओ वुमनिया, बक्कळ कमावतेस मग, गुंतवणूक कर की जरा!
Mutual Fund
Mutual FundSakal

म्युच्युअल फंड( Mutual Funds)

कोणत्याही प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी, नवशिक्या किंवा अनुभवी व्यक्तींसाठी म्युच्युअल फंड हा चांगला पर्याय आहे.  तुमचे उद्दिष्ट किती आहे त्यावर पैसे देणे अवलंबून असल्याने महिलांना ते फायदेशीर ठरकते. तुम्ही नवीन गुंतवणूकदार असाल, तर तुम्ही सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) ने सुरुवात करू शकता. यात तुम्ही दर महिन्याला काही रक्कम गुंतवू शकता. ती रक्कम तुमच्या खात्यातून दरमहा रक्कम ऑटोमेटिक-डेबिट केली जाईल, त्यामुळे तुम्हाला तुमच्या गुंतवणूक धोरणाशी वचनबद्ध राहता येईल. अगदी ५०० रूपयांपासून कितीही रक्कम गुंतवता येईल.

women investment
दीर्घ कालावधीत भरघोस रिटर्न्स देणारे शेअर्स! मार्केटमध्ये करा गुंतवणूक
Trade deficit worries over rupee depreciation
Trade deficit worries over rupee depreciation

एक्सचेंज ट्रेडेड फंड (Exchange traded funds (ETFs))

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी खूप संशोधन करावे लागायचे, ते महिलांसाठी तेव्हा आवाक्याबाहेरचे होते. आता मात्र, सिक्युरिटीजचा ईटीएफ हा मुख्य विभाग असून ती मालमत्तेचे प्रश्न विचारात घेते. यात इक्विटी, कर्ज, स्टॉक, बाँड, कमोडिटी किंवा चलन असे विविध पर्याय मिळतात. एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केल्याप्रमाणे तुम्ही त्या विभागाचा एक भाग खरेदी करू शकता. इटीएफचे ETF व्यवहार स्टॉक एक्स्चेंजमध्ये केले जातात. यात तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या विविध फायद्यांसह स्टॉक ट्रेडिंगची सुविधा मिळते.

women investment
'व्हेरी स्मार्ट इन्व्हेस्टर' होण्यासाठी पाच पायऱ्या
stock market
stock market

स्टॉक्स (Stocks)

स्टॉक्स, इक्विटी म्हणूनही ओळखले जातात. ते कंपनीच्या अंशात्मक मालकीचे प्रतिनिधित्व करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एक छोटासा भाग विकत घेता. काही सर्वात मोठे ब्रँड आता लोकांना त्यांचे स्टॉक खरेदी - विक्री करण्याची परवानगी देतात. कधीकधी स्टॉकच्या कामगिरीशी संबंधित अस्थिरता निर्माण झाली तर हा अधिक जोखमीचा मार्ग मानला जातो. असे का होते, त्याची काही कारणे आहेत.कंपनीची प्रति शेअर किंमत कंपनीचा ताळेबंद, तिचे नेतृत्व या काही गोष्टींवर अवलंबून असते. स्टॉक्समध्ये अपवादात्मक परतावा देण्याची क्षमता आहे. एका दिवसात त्यांची किंमत किती वाढू शकते या कारणामुळे, या मालमत्ता वर्गातील गुंतवणूक प्रत्येक स्त्रीसाठी योग्य असेलच असे नाही. त्यामुळे यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.

women investment
Short Term Stocks: मजबूत नफा हवा आहे, मग या 2 स्टॉक्सचा नक्की विचार करा
equity fund
equity fundsakal

युएस इक्विटीज (U.S. Equities)

भारताच्या उदारीकृत रेमिटन्स स्कीम (LRS) मुळे, स्त्रिया भारतातील त्यांच्या घरातून परदेशात यूएस इक्विटीमध्ये गुंतवणूक करू शकतात. जर यूएस स्टॉक्समध्ये थेट गुंतवणूक ही गोष्ट विचारात घेण्यास तयार नसाल, तर अनेक मालमत्ता व्यवस्थापन कंपन्या (AMCs) फीडर फंड ऑफर करतात. जर तुम्ही ृ नोकरी करत असल्यास, तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ इंटरनॅशनल इक्विटी, इंटरनॅशनल ईटीएफ आणि देशांतर्गत स्टॉकमध्ये वाटप करण्याचा विचार करू शकता. या मालमत्ता वर्गांमध्ये सामान्यत: मुदत ठेवी (FD) पेक्षा जास्त जोखीम असते, परंतु तुमचे कोणतेही अल्पकालीन नुकसान भरून काढले जाण्याची शक्यता असते कारण तुमचे तरूण वय हा मुद्दा महत्वाचा ठरतो.

त्याचप्रमाणे, जसे जसे तुमचे वय वाढेल आणि सेवानिवृत्तीचा विचार करायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही कमी जोखीम पत्करता. कारण तुम्हाला नोकरीतून नियमित उत्पन्नाची हमी मिळत नाही. भांडवल संरक्षण महत्त्वाचे बनते. FDs, इक्विटी विभागातील ब्लूचिप नावे आणि अल्प-मुदतीचे ते मध्यम मुदतीचे बॉन्ड्स यांचे संयोजन या परिस्थितीत एक शहाणपणाची निवड असू शकते.

women investment
Go Fashionचे शेअर्स वधारले! गुंतवणूकदारांना तब्बल 91 टक्क्यांचा परतावा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()