Teacher's Day: तुमच्या आवडत्या शिक्षकांना द्या हटके शुभेच्छा, पहा एकापेक्षा एक भारी मेसेज

हा विशेष दिवस शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे.
teachers day
teachers daysakal
Updated on

प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुचं स्थान अग्रगण्य आहे. माणसाचे आयुष्य घडवणारे हे बहुदा गुरू किंवा शिक्षक असतात. आज याच गुरुंचा, शिक्षकांचा दिवस अर्थात शिक्षक दिन. आपल्या आयुष्यातील गुरूचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला सलाम करण्यासाठी भारतात दरवर्षी शिक्षक दिन साजरा केला जातो.

भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस म्हणजेच ५ सप्टेंबर हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा विशेष दिवस शिक्षकाचा सन्मान आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आहे. तुम्ही तुमच्या शिक्षकांना शिक्षकदिनाच्या शुभेच्छा दिल्या का? आज आम्ही तुम्हाला असेच काही हटके मेसेज सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

teachers day
History of Teachers' Day: शिक्षक दिनाचा नेमका इतिहास काय आहे?

1. योग्य काय अयोग्य काय हे सांगता तुम्ही,

खोटं काय खरं काय हे समजावता तुम्ही,

जेव्हा काहीच कळत नाही,

तेव्हा मार्ग दाखवता तुम्ही..

आयुष्यातील प्रत्येक अंधारात

प्रकाश दाखवता तुम्ही..

हॅपी टीचर्स डे..!

2. आम्हाला प्रेरित करण्यासाठी,

आम्हाला आमच्या पायावर उभं करण्यासाठी,

आम्हाला यशस्वी बनवण्यासाठी,

तुमचे खूप खूप धन्यवाद…

हॅपी टीचर्स डे..!

teachers day
Teacher : निवडणुका, जनगणनेनंतर आता शिक्षक करणार चहा वाटपाचं नियोजन

3. 2G, 3G, 4G,

5G, 6G पण येईल

पण आम्हाला घडविण्यासाठी

गुरुG,

शिवाय पर्याय नाही..

शिक्षक दिनाच्या शुभेच्छा..!

4. गुरु शिवाय नाही होत जीवन साकार,
डोक्यावर जेव्हा असतो गुरूंचा हात,
तेव्हाच मिळतो जीवनाला खरा आकार
माझ्या डोक्यावर नेहमी आशीर्वाद
आणि ज्ञानाचा हात ठेवल्याबद्दल
माझ्या गुरूंचे खूप खूप आभार..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

teachers day
Teachers' Day: शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश (Messages)

5. अपूर्णाला पूर्ण करणारा,
शब्दांनी ज्ञान वाढविणारा,
जगण्यातून जीवन घडविणारा,
तत्त्वातून मूल्ये फुलविणा-या,
ज्ञानरुपी गुरुंना..
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

6. सूर्य किरण जर उगवले नसते,
तर आकाशाचा रंगच समजला नसता,
जर महात्मा जोतिबा फुले जन्मले नसते,
तर खरचं स्त्री शिक्षणाचे महत्व समजले नसते…
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

teachers day
National Awards To Teachers साठी अर्ज करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ

7. शि म्हणजे शीलवान
क्ष म्हणजे क्षमाशील
क म्हणजे कर्तव्येनिष्ठ
अशा सर्वच शिक्षकांना वंदन
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

8. काय देऊ गुरूदक्षिणा,
मनातल्या मनात येई विचार..
आयुष्य दिलं तरी फेडता
येणार नाही तुमचं ऋण.
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

9.शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी घालण्याचे सामर्थ्य देणारे
आदराचे स्थान म्हणजे आपले शिक्षक
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10. गुरुविण न मिळे ज्ञान,
ज्ञानाविण जगी न होई सन्मान,
जीवन भवसागर तराया,
चला वंदूया गुरुराया,
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.