लग्नानंतरची दोन वर्षे का महत्वाची! ही तीन कारणे वाचाच

सुरुवातीचा काळ हा विवाहाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो
marraige
marraigeesakal
Updated on
Summary

पण एकदा लग्न झाल्यावर ती व्यक्ती तुमच्या २४ तास सोबत राहणार असते. अशावेळी एकमेकांना सांभाळून, चर्चा करून वाटचाल करणं महत्वाचं ठरतं.

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खूप महत्वाचा भाग असतो. लग्न (Marriage) करण्याआधी एकमेकांना व्यवस्थित पारखून घेणे, विचार जुळतायत का ते पाहणे महत्वाचे असते. यासाठी आधी २-३ वेळा भेटून अंदाज येऊ शकतो. त्यानंतर जर लग्न ठरवलंत तर तुम्ही एकमेकांना आणखी कसे पुरक होऊ शकता, यादृष्टीने प्रयत्न करता येतात. यासाठी तुम्ही दिवसातले काही तास कधी संपूर्ण दिवस एकमेकांना देता. पण एकदा लग्न झाल्यावर ती व्यक्ती तुमच्या २४ तास सोबत राहणार असते. अशावेळी एकमेकांना सांभाळून, चर्चा करून वाटचाल करणं महत्वाचं ठरतं.

महत्वाचं म्हणजे, तुमच्या वैवाहिक जीवनात कधीकधी समस्या, संघर्ष निर्माण होऊ शकतो. पण, अशावेळी एकमेकांशी बोलले पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीवर चर्चा करावी. असे लग्नाच्या पहिल्या वर्षापासूनच केले पाहिजे कारण सुरुवातीचा काळ हा विवाहाचा एक महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळेच लग्नाची पहिली दोन वर्षे एकमेकांना समजून घेण्यासाठी या तीन गोष्टींचा सामना करावा लागू शकतो.

marraige
नववर्षात डेटिंग करण्याचा विचार करताय? हे असतील ६ ट्रेंड
honeymoon
honeymoon esakal

हनीमून ब्ल्यूज (Honeymoon blues)

लग्नानंतर किंवा हनिमूननंतर काही जोडप्यांना उदास आणि दुःखी वाटू शकते. हा काळ हनिमून ब्लूज समजला जातो. लग्नसमारंभांमध्ये खूप उत्साह असतो. लग्नानंतर मात्र जोडप्यांना अचानक उदासीनता आणि रिक्तपणा जाणवू शकतो. विशेषत: मुलींना माहेर सोडून आल्यामुळे तो आणखी जाणवतो. त्यामुळे, नवीन लग्न झालेल्या जोडप्यांनी हनिमून ब्लूजसाठी चांगली तयारी केली पाहिजे. इतर सर्व जबाबदाऱ्या सांभाळत रोमान्स कसा जिवंत ठेवता येईल यावर त्यांनी अधिक भर द्यायला हवा.

marraige
तुम्ही 'मेड फॉर इच अदर' आहात हे कसं ठरवाल? चार टिप्स फॉलो करा
couples
couplesesakal

भ्रमनिरास होण्याची शक्यता (Disillusionment)

लग्नाची पहिली दोन वर्षे जोडप्यांमध्ये भ्रमनिरास होण्याची शक्यता असते. या काळात त्यांच्या संबंधात होणारे चांगले-वाईट बदल हे दीर्घकाळ परिणाम करू शकतात. पूर्वीच्या संशोधनात असे दिसून आले आहे की लग्नाच्या सुरुवातीच्या काळात काही विवाहित जोडप्यांमध्ये एकमेकांबद्दल भ्रम आणि नकारात्मक भावना होत्या. त्याचा शेवट घटस्फोटात झाला. तर, सकारात्मक विचारसरणीने नव्या टप्प्याची सुरुवात करणाऱ्या जोडप्यांना लग्नानंतर सुखद अनुभव आले, त्यांनी त्यांच्या समस्याही निकोप पद्धतीने सोडविल्या. म्हणूनत नवीन नातेसंबंधाची सुरुवात केवळ सकारात्मक विचार ठेवणे गरजेचे आहे.

marraige
शारीरिक संबंधासाठी बायकोचा नकार? जाणून घ्या पाच कारणे
Relationship
Relationshipesakal

कठीण काळात काय करावे ? (How to handle a tough time?)

लग्नाच्या पहिल्या वर्षांमध्ये जोडप्यांमध्ये संघर्ष होऊ शकतो. अशावेळी टोकाचा विचार न करता एकमेकांशी स्पष्ट आणि मोकळा संवाद साधणे खूपच महत्वाचे ठरते. यासाठी एकमेकांना दोष न देता बोलण्याचा प्रयत्न करा. कारण हा काळ तणावपूर्ण असू शकतो, पण, तो आनंददायी कसा करायचा ते तुमच्या हातात आहे. या काळात जोडपी आनंदी राहण्यासाठी एक मजबूत बंध निर्माण करू शकतात.

marraige
किस करा.. फिट राहा... होतात ५ फायदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()