Valentines Day 2024 : फेब्रुवारी महिन्याला ‘प्रेमाचा महिना’ म्हणून खास ओळखले जाते. या महिन्यातच प्रेमाचा दिवस अर्थात ‘व्हॅलेंटाईन डे’ मोठ्या उत्साहात १४ फेब्रुवारीला जगभरात साजरा केला जातो. या व्हॅलेंटाईन डे च्या आठवडाभर आधी विविध प्रकारचे दिवस साजरे केले जातात. ज्यामध्ये, चॉकलेट डे, रोझ डे, प्रपोझ डे, टेडी डे इत्यादी अनेक दिवस साजरे केले जातात.
व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्यासाठी अनेक कपल्स हटके प्लॅन्स बनवतात. काही जण जोडीदारासोबत फिरायला जातात तर काही जण कॅंडल लाईट डिनरचा प्लॅन करतात. हा दिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी कपल्स उत्सुक असतात.
आजच्या या स्पेशल दिवशी अनेक तरूणी लाल रंगाचे आऊटफीट्स ट्राय करायला प्राधान्य देतात. जर तुम्हाला आजच्या स्पेशल दिवशी छान प्रकारे तयार होऊन, जोडीदाराचे मन जिंकून घ्यायचे असेल, तर खास तुमच्यासाठी आम्ही काही रेड आऊटफीट आयडियाज घेऊन आलो आहोत.
सध्या सर्वत्र कडाक्याची थंडी अजून ही आहे. त्यामुळे, आजच्या या खास दिवशी तुम्हाला छान प्रकारे तयार ही व्हायचे असते, आणि थंडीपासून स्वत:चे संरक्षण देखील करायचे असते. त्यामुळे, तुम्ही या रेड वूलन वनपीसचा विचार करायला काही हरकत नाही.
या वनपीसमध्ये तुम्ही अभिनेत्री क्रिती सेनॉनप्रमाणे ग्लॅमरस ही दिसाल आणि तुम्हाला थंडी देखील वाजणार नाही. मिनिमल मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करून तुम्ही हा लूक पूर्ण करू शकता.
आजकाल अनेक प्रकारचे प्लेन रंगाचे बॉडीकॉन ड्रेस मार्केटमध्ये आले आहेत. यात आता सिक्विन्स बॉडीकॉन ड्रेसची देखील भर पडली आहे. बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्रींना तुम्ही अशा प्रकारच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये पाहिले असेल.
व्हॅलेंटाईन डे साठी या प्रकारचा आऊटफीट हा बेस्ट ऑप्शन आहे. अभिनेत्री सुहाना खानप्रमाणे तुम्ही देखील असा ड्रेस ट्राय करू शकता. फक्त यावर मोकळे केस, ग्लॉसी मेकअप आणि ज्वेलरी कॅरी करायला विसरू नका.
को-ऑर्ड्स आऊटफीट्सची आजकाल तरूणींमध्ये भलतीच क्रेझ आहे. या प्रकारचे ड्रेस हे कोणत्याही वयोगटातील महिलांना अगदी शोभून दिसतात. यामध्ये फ्लोरल प्रिंट, प्लेन कलर्स इत्यादी अनेक प्रकारचे ऑप्शन्स उपलब्ध आहेत.
आजच्या स्पेशल दिवशी तुम्ही अभिनेत्री रकुलप्रमाणे लाल रंगाचा को-ऑर्ड्स नक्कीच परिधान करू शकता. बाजारात तुम्हाला विविध प्रकारचे आणि रंगांचे को-ऑर्ड्स सेट्स सहज मिळतील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.