Reduce Belly Fat : असं वाटतं की, सुटलेल्या ढेरीवरून एखादा रोड रोलर फिरवावा ; फक्त एवढंच करा आणि कमाल बघा!

पोटावर रोड रोलर चालवावा ज्यामुळं पोट डांबरी रस्त्यासारखं सप्पाट होईल
Reduce Belly Fat
Reduce Belly Fat esakal
Updated on

Reduce Belly Fat : डिलिव्हरी नंतर असो किंवा सतत लॅपटॉपवर बसून केलेल्या कामामुळे आजकाल प्रत्येकाची ढेरी दिसत आहे.या सुटलेल्या पोटामुळे ना कॉन्फिडन्स राहिलाय ना सुंदरता. ही समस्या पुरूष आणि स्त्रीया दोघांनाही सतावत आहे. सध्या सर्वांसमोरचे मोठे आव्हान असते सुटलेले पोट कमी करणे. पण प्रत्येकाला ते शक्य होतेच असे नाही.

वाढलेल्या पोटामुळे फेवरेट कपडे, शर्ट किंवा क्रॉप टॉप घालता येत नाही. तेव्हा आरशासमोर उभराहून आपण पोट कधी कमी होणार याचा फक्त विचार करतो. पण, काही लोक तर असाही विचार करतात की पोटावर रोड रोलर चालवावा ज्यामुळं पोट डांबरी रस्त्यासारखं सप्पाट होईल. पण हा केवळ विचारच बरा वाटतो. जर तुम्हाला खरंच पोट कमी करायचं असेल तर एका भन्नाट डायट प्लॅन आज मी तुम्हाला सांगतेय.

जेव्हा पोटात चरबी जास्त असते किंवा वजन वाढते तेव्हा लोक अस्वस्थ होतात. वाढत्या वजनामुळे अनेक आजार होतात, तर लठ्ठपणामुळेही लोकांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होतो. आजकाल स्लिम आणि हेल्दी दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते.

Reduce Belly Fat
Weight Loss : फक्त एका महिन्यात कमी होईल वजन; असा घ्या आहार

आजच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्यामुळे लोकांचं वजन वाढू लागतं आणि पोटाची चरबी दिसू लागते. वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी लोक योग, व्यायाम आणि आहारासारखे बरेच प्रयत्न करतात.

नियमित योगाभ्यास किंवा व्यायामाचाही काही परिणाम होतो. वजन बऱ्याच अंशी कमी होतं, पण व्यायाम किंवा योगा करणं थांबवलं तर पुन्हा वजन वाढू शकतं. अशावेळी खूप मेहनत करूनही पोटाची चरबी कमी होत नाही.

त्यामुळे मेहनत न करता योग्य वेळी नाश्ता करून वजन कमी करता येते. तज्ज्ञांच्या मते, ब्रेकफास्टच्या वेळेत बदल केल्यास लोक जवळपास पाच किलो वजन कमी करू शकतात. जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी कोणत्या वेळी नाश्ता करावा.  

Reduce Belly Fat
Weight Loss : मधुमेहाच्या रूग्णांनी वजन कमी करण्यासाठी वापरा या 4 ट्रिक्स, हृदयावर ताण पडणार नाही

सकाळची शेतात जाण्याची घाई होती आणि सूर्यास्त झाल्यानंतर अंधार पडताच रात्र व्हायची. म्हणूनच लोक सकाळी लवकर नाश्ता करून बाहेर पडायचे. तर सायंकाळ होताच लवकर जेऊन झोपी जायचे. रात्रीचे जेवण आणि सकाळचा नाश्ता यात बरेच अंतर होते.

तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण आणि ब्रेकफास्ट मध्ये किमान 14 ते 16 तासांचे अंतर ठेवल्याने लोक निरोगी आणि तंदुरुस्त राहतात. मात्र, आजच्या बदलत्या आणि ढासळत्या जीवनशैलीत लोकांच्या खाण्या-पिण्याच्या वेळाही बिघडल्या आहेत. लोक रात्री उशिरापर्यंत जागून काहीतरी खात-पितात.

त्याचबरोबर सकाळी कॉलेज किंवा ऑफिस असल्याने एकतर विनामार्ग बाहेर जावे किंवा सकाळी काहीतरी खावे. अशा तऱ्हेने त्यांचे रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात कोणतेही अंतर राहत नाही. ज्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते.

Reduce Belly Fat
Weight Loss करायचं असेल तर कॅलरीचा हिशोब ठेवावाच लागेल, आहारात घ्या हे 5 लो कॅलरी फूड्स

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय?

तज्ञ लोकांना अधूनमधून उपवास करण्याची शिफारस करतात. रात्रीचे जेवण आणि नाश्ता यात जास्त अंतर असते. त्यासाठी नाश्त्याची वेळ बदलून सकाळी ११ करावी, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. लंडनच्या किंग्ज कॉलेजमधील जेनेटिक एपिडेमिओलॉजीचे प्राध्यापक म्हणतात की, वजन कमी करण्यासाठी सकाळी ११ वाजेपर्यंत नाश्ता करू नये.

एका रिसर्च रिपोर्टनुसार, रात्रीचं जेवण लवकर करून तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये कमीत कमी 14 तास उपवास करावा. रात्रीच्या जेवणाची वेळ रात्री ८ किंवा ९ असेल तर सकाळी ११ वाजता नाश्त्याची वेळ ठेवा. एवढ्या उशीरा नाश्ता करायचा नसेल तर संध्याकाळी ६-७ वाजता जेवण करा. एकंदरीत सुमारे १४ तास उपवास करावा लागतो. यामुळे तुमचे वजन नियंत्रणात राहते आणि शरीर डिटॉक्स होते.

Reduce Belly Fat
Weight Gain: वाढलेलं वजन चेष्टा नव्हे, त्यामुळे होतायत हे गंभीर आजार, तुमचंही वजन वाढलंय का? व्हा सावध

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.