Relationship Tips : घरात सतत होतं कडाक्याचं भांडणं, या गोष्टी जोडीदाराला समजून घेण्यात ठरतील फायदेशीर

Relationship Tips For Couples : तुम्हीही जोडीदारासोबत सतत भांडत असाल तर नात्यात येणारी धोक्याची घंटा वेळीच ओळखा. कारण...
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips In Marathi:

काही जोडपी अशी असतात की जी एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. तर काही एकमेकांसोबत राहू शकत नाहीत. कारण, त्यांचे कधीच पटत नाही. त्यामुळे एकमेकांसमोर आलं की वाद होतात, चिडचिड होते या अनुभवातून अनेक लोक जात आहेत. नातं तोडून टाकणं सोप्प आहे पण प्रेमाने ते निभावणं तितकेच कठीण.

तुम्हीही जोडीदारासोबत सतत भांडत असाल तर नात्यात येणारी धोक्याची घंटा वेळीच ओळखा. कारण, तुम्ही तुमचा स्वभाव बदलला नाही. तर, तुम्हाला संकटाला सामोरे जावे लागू शकते. कारण, पती-पत्नीच्या नात्यात परस्पर समंजसपणा खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही तुमचे नाते टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.

Relationship Tips
Relationship Tips : संशयाचा किडा तुमच्या डोक्यात वळवळत असेल तर या गोष्टी नक्की करा, जोडीदारावरील प्रेम अन् विश्वास वाढेल!

भावना समजून घ्या (Tips for building mutual understanding between a husband and wife)

आजकाल लोक प्रॅक्टिकल विचार करतात. आपल्या एखाद्या कृत्यामुळे समोरील व्यक्तीच्या भावना दुखावल्या जातील, याचा ते विचार करत नाहीत. राग शांत झाल्यानंतर जेव्हा ती व्यक्ती दुखावली हे लक्षात येतं, तेव्हा मात्र हे लोक पश्चाताप करत बसतात. त्यामुळे, पती-पत्नीने एकमेकांच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत.

जोडीदाराचे ऐकून घ्या (Tips for Couple)

अनेकवेळा तुम्ही जोडीदाराला दुय्यम दर्जा देतो. विशेषत: पुरूष स्त्रियांना काही कळत नाही हा विचार करून त्यांचे मत विचारात घेत नाहीत. मात्र, तुम्ही असे करू नका. तुम्ही तुमच्या जोडीदाराचे म्हणणे ऐकून घ्या. तुम्ही तिचे लक्षपूर्वक ऐकले पाहिजे. तसेच, खुल्या मनाने एकमेकांशी बोलले पाहिजे. तरच नात्यातील कटूता निघून जाईल.

गैरसमज दूर करा (Mutual Understanding Tips)

काहीवेळा त्रयस्त व्यक्तीमुळे पती-पत्नीमध्ये गैरसमज होतात. हे गैरसमज वाढत जातात. पण या गोष्टी बोलून दूर न केल्यास हे गैरसमज दोघांमध्ये अंतर निर्माण करतात. त्यामुळे जोडीदाराच्या भूतकाळाबाबत काही गोष्टी कानावर आल्या असतील तर त्या वेळीच त्याच्याशी बोलून घ्या.

एकमेकांचा आदर करा आणि चूक झाली असेल तर दोघांपैकी एकाने माफी मागून वाद संपवावेत. कोणीतरी म्हटलंय की, संवाद संपले की वाद उरतात अन् ते वाढतात. त्यामुळे तुमचा जोडीदार नाराज असेल तर त्याची समजूत काढा. एकमेकांमधील वाद संपवा अन् एकमेकांना वेळ द्या.

Relationship Tips
Relationship Tips :  लग्नाआधीच बदला या सवयी, वैवाहीक जीवनाचा प्रवास होईल सुखकर

जोडीदाराशी प्रामाणिक रहा (Relationship Tips In Marathi)

तुमचा जोडीदार कितीही तुमच्यावर प्रेम करत असेल. पण दुसरीकडे मात्र तो विश्वासघात करत असेल तर तुमचं नातं कधीच टिकणार नाही. कारण, पती किंवा पत्नी फसवणूक, विश्वासघात कधीही सहन करू शकत नाही. तो तुमच्या अनेक चूका पोटात घालेल मात्र तुम्ही त्याच्याशी केलेली प्रतारणा तो कधीच विसरू शकत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.