Relationship Tips: तुमच्या नात्यातही पडलाय का? कम्युनिकेशन गॅप ; मग या टिप्स नक्की वाचा

नात्यात कम्युनिकेशन गॅप पडला की या अशा गोष्टी घडतात.
Relationship
RelationshipSakal
Updated on

बागेत एक जोडपे बसलेले. त्याचे अनेक विषयांवर बोलणे सुरू होते. त्यांनतर अचानक त्यांच्यात काहितरी वाद झाला आणि ती तरूणी उठून निघून गेली. त्यानेही तिला अडवले नाही. तस पहायला गेलं तर खूप किरकोळ गोष्ट होती. पण तीच उठून जाण आणि त्याने तिला अडवले नाही. हेच आजकाल घडत आहे.

नात्यात कम्युनिकेशन गॅप पडला की या अशा गोष्टी घडतात. तुमचेही असे अनेक वाद होत असतील ना? त्यावेळी योग्य मार्ग दाखवणारे कोणीतरी हवे असते. पण चुकीच्या सल्ल्याने वाद संपण्याऐवजी ते आणखीनच वाढतात. तर त्यावेळी नेमकं काय करावे याबद्दल आज जाणून घेऊयात..

Relationship
Relationship Tips: पार्टनरसोबत भांडताना चिडण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारा

ऐकायला शिका

कम्युनिकेशन म्हणजे केवळ नुसते बोलणे नसून समोरच्या व्यक्तीचे ऐकणे आणि समजून घेणे होय. नात्यातील पोकळी भरून काढायची असेल तर जोडीदारासोबत वेळ घालवा. स्वत:चेच ऐकवण्याआधी आपल्या पार्टनरला बोलण्याची संधी द्या. त्यांचे ऐकल्यानंतर विचार करून मगच उत्तर द्या.

पॉझिटीव्ह रहा

वाद झाल्यावर बोलणे सुरू करण्याआधी पॉझिटीव्ह विचार करा. बोलण्याची सुरुवात मोकळेपणाने करा. नात्यातील वादाचे मुद्दे जुन्या गोष्टींवर पुन्हा पुन्हा चर्चा करत बसू नका.

स्वत:ला पार्टनरच्या जागी ठेवा

तुमच्या पार्टनरचे नक्की काय बिनसले आहे ते समजून घ्या. ज्यामुळे दुरावा आला असेल तर त्या गोष्टी समजून सुधारण्याचा प्रयत्न करा. आपण आपले नाते टिकवू शकतो, असा विश्वास पार्टनरला द्या.

Relationship
Relationship Tips : नाते जपताना तुम्ही स्वतःला हरवताय का?

प्रामाणिक रहापार्टनरसोबत खोटं बोलू नका. गोष्टी लपवण्याऐवजी प्रामाणिकपणे सांगायला शिका. तुमच्या चुका मान्य करा. पार्टनरने आरोप केलेल्या स्विकारून गोष्टी तुम्ही त्या बदलण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पार्टनरला द्या. वेळ घालवा
एकांतात वेळ घालवातुमच्या जोडीदारासोबत एकांतात वेळ घालवा. टीव्ही, फोन यासारख्या गोष्टी बाजूला ठेवा. शहरापासून दूर एखाद्या सुंदर शांत ठिकाणी ट्रिपला जा. कॉफी शॉप किंवा हॉटेलमध्ये जा. जिथे तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला येणार नाही.जे काही प्रोब्लेम आहेत ते तुमच्या दोघांचे आहेत. ते तुम्हालाच सोडवावे लागणार आहेत.
संपूर्ण आयुष्यात वादच आठवणीत ठेवायचे की काही आनंदी क्षण गोळा करायचे हे तुमच्या हातात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()