Relationship Tips: योग्य जोडीदार हवाय? 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा

मुलगी बघण्याच्या कार्यक्रमात कोणते प्रश्न विचारावे हे समजले तर योग्य जोडिदार निवडणे सोपे होते.
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips : आयुष्याचा जोडिदार निवडणे ही अत्यंत महत्वाची घटना असते. सगळ्यांचेच लव्ह मॅरेज होत नाही. मग ठरवून लग्न करण्याच्या प्रक्रियेत मुलगा-मुलगी बघणे कार्यक्रम होतो. त्या काही मिनीटांच्या भेटीत हाच आपला योग्य जोडिदार आहे हे कसे ओळखावे हा मोठा प्रश्न असतो. याच प्रश्नाचे उत्तर म्हणून आम्ही काही प्रश्न घेऊन आलो आहोत.

Relationship Tips
Relationship Tips : तुमचा 'एक्स' आयुष्यात परत आला तर...?

अलीकडच्या काळात घरी न जाता हॉटेलमध्येही भेटण्याची पद्धत प्रचलित होते आहे. तुमच्यासोबत आई-वडील आणि जवळचे नातेवाईक असतात. जेव्हा नातेवाईक एकमेकांशी बोलतात तेव्हा मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांशी बोलण्याची संधी दिली जाते. अशा परिस्थितीत कोणते प्रश्न विचारावेत जेणेकरून त्याला निवड करणे सोपे त्याबद्दलच्या टिप्स पाहा

Relationship Tips
Relationship Tips: तुमचा नवरा बेस्ट अन् परफेक्ट आहे का?

तुम्हाला कसा जोडीदार हवा आहे?

प्रत्येक व्यक्तीची आवडनिवड वेगळी असते. त्यामुळे आपल्याला आवडणारी गोष्टी दुसऱ्यालाही तितकीच आवडेल असे नाही. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच विचारा की त्यांना कोणत्या प्रकारची व्यक्ती आपला आयुष्याचा जोडीदार व्हावे असे वाटते. यासंदर्भातील कल्पना काय आहे.

Relationship Tips
Relationship Tips: जोडीदाराचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे? जाणून घ्या

सहसा मुलींना प्रौढ, काळजी घेणारे, सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र मुले आवडतात. कधीकधी मुलींना साधे व्यक्तिमत्त्व असणारीही व्यक्ती आवडते. त्यांच्या आवडी-निवडी जाणून घेतल्यास तुम्ही त्यांच्यासाठी योग्य जोडीदार होऊ शकता की नाही हे जाणून घेऊन तुम्हाला योग्य निर्णय घेणे सोपे होईल.

Relationship Tips
Relationship Tips : नातं टिकवण्यासाठी Struggle करताय?

तुम्हाला काय आवडते?

व्यक्तिमत्त्वाबद्दल समजून घेताना त्याच्या आवडी-निवडीबद्दल तपशील मिळवावा. उदाहरणार्थ, त्यांचे छंद काय आहेत? त्यांना काय आवडते? यामध्ये चित्रपट पाहणे, प्रवास करणे, आवडते रंग परिधान करणे, खरेदी करणे, मेकअप करणे, स्वयंपाक करणे, पेंटिंग करणे यांचा समावेश असू शकतो. आवडीनिवडी जाणून घेतल्यामुळे तुम्हाला त्यांच्या आणि तुमच्या आवडीनिवडींचा अंदाज येईल. त्यामुळे लग्नाबाबत निर्णय घेणे सोपे जाईल.

Relationship Tips
Relationship Tips: तुमच्या नात्यातही पडलाय का? कम्युनिकेशन गॅप ; मग या टिप्स नक्की वाचा

शाकाहारी आहात की मांसाहारी

अनेकवेळा मुलगा मांसाहारी असतो आणि मुलगी शाकाहारी असते. किंवा बरोबरच याच्या उलटे असते. अशावेळी आहाराच्या सवयींमुळे लग्नानंतर अडचणी निर्माण होऊ शकतात. मुलगा असो वा मुलगी, तुम्ही तुमच्या भावी जीवनसाथीला हा प्रश्न जरूर विचारला पाहिजे की ते शाकाहारी आहेत की मांसाहारी? कारण एखादा वेगळा चॉईसही असेल तर नंतर जगणं अवघड होऊन जातं. कारण हा रोजचाच मुद्दा होऊन बसतो. त्याच वेळी, मांसाहारी व्यक्ती अनेकदा आपल्या जीवनसाथीला मांसाहारी होण्यासाठी प्रवृत्त करते, ज्यामुळे वाद निर्माण होतो.

Relationship Tips
Relationship Tips: पार्टनरसोबत भांडताना चिडण्याआधी स्वतःला हे प्रश्न विचारा

तुमच्या भविष्यातील योजना आणि अपेक्षा काय आहेत?

प्रत्येक व्यक्ती निश्चितपणे विचार करते की लग्नानंतर त्याला कोणत्या प्रकारचे जीवन जगायचे आहे. प्रत्येक मुलीची तिच्या संसारासंदर्भातील काही कल्पना असते, अपेक्षा आणि भविष्यातील योजना असतात. काही मुलींना लग्नानंतर गृहिणी म्हणून जगायचे असते, तर अनेक मुली आहेत ज्यांना लग्नानंतर नोकरी करताना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहायचे असते. त्यामुळे तुमची तुमच्या जोडीदाराची अपेक्षा आणि मुलीची अपेक्षा या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्यानंतर तुम्ही निर्णय घेऊ शकता. म्हणजे नंतर यासंदर्भात वाद होण्याची वेळ येत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.