Relationship Tips : संशयाचा किडा तुमच्या डोक्यात वळवळत असेल तर या गोष्टी नक्की करा, जोडीदारावरील प्रेम अन् विश्वास वाढेल!

पती-पत्नीचं नातं प्रेमाच्या रूंद पुलावर टिकून असतं. या पुलाचा एकही खांब निखळला तर नातंही कोसळतं.
Relationship Tips
Relationship Tips esakal
Updated on

Relationship Tips :

जोडीदारासोबत कितीही प्रामाणिकपणे राहिलो तरी तो संशय घेतो म्हणून आणि अनेक जोडपी वेगळी झाली आहेत. तर अनेक महिला आणि पुरुषांनी आपलं जीवन संपवल आहे. संशयाची पाल मनात फिरायला लागली की नात्यातला गोडवा संपून जातो.

नुकतेच एका विवाहित महिलेने पती उगीचच संशय घेतो, मारहाण करतो म्हणून आपली जीवन यात्रा संपवली आहे. तुम्ही प्रामाणिक आहात पण जोडीदार संशय घेत असेल तर काय करणार, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.

पती-पत्नीचं नातं प्रेमाच्या साकवावर टिकून असतं. या पुलाचा एकही खांब निखळला तर पूल कोसळतो. तसं प्रेमाची जागा संशयाने घेतली पती-पत्नीचे नातंही कोसळून जातं.

Relationship Tips
Relationship Tips : या लक्षणांवरून ओळखा जोडीदार साथ देणार की मध्येच देणार डच्च्यू

तुमचं नातंही अशाच टप्प्यावरती येऊन थांबलं असेल तर काय करावं, जोडीदाराची समजूत कशी काढावी याचा विचार तुम्ही नक्कीच करत असाल. आम्ही सांगितलेल्या काही गोष्टी तुमच्या कामी येतील.

दॅट कल्चर थीम्स मधील सायकॉलॉजिस्ट कोच गुरलिन बरूआ म्हणतात की, जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा विश्वास जिंकायचा असेल तर तुम्ही जोडीदाराचा मोबाईल कधी तपासू नका. तुम्ही या मर्यादाचे उल्लंघन केले तर ते तुमच्या नात्यासाठी घातक ठरू शकते.

Relationship Tips
Relationship Tips : या लक्षणांवरून ओळखा जोडीदार साथ देणार की मध्येच देणार डच्च्यू

नात्यात वाढू शकतो अविश्वास

तुम्ही जोडीदाराचा फोन तपासल्याने तुमच्या जोडीदाराचा तुमच्यावर विश्वास उडू शकेल. म्हणजे त्याला तुमच्याबद्द असुरक्षित भावना निर्माण होऊ शकते. जोडीदारासोबत कितीही प्रामाणिकपणे राहिलो तरी तो संशय घेतो म्हणून आणि एक जोडपी वेगळी झाली आहेत. तर अनेक महिला आणि पुरुषांनी आपलं जीवन संपवल आहे. संशयाची पाल मनात फिरायला लागली की नात्यातला गोडवा संपून जातो.

जरी तुमच्या जोडीदाराने परवानगी दिली, कि तू माझा फोन तपासू शकतोस, तरीही तिच्या मोबाईलला हात लावू नका. कारण, कुठल्याही नात्यात अविश्वास निर्माण होणारी ही पहिली पायरी ठरू शकते.

तुमच्या जोडीदार एखाद्या मित्राशी किंवा कुटुंबातील सदस्याशी बोलत असेल, मला भेटत असेल तरी तुम्हाला संशय येऊ लागतो. त्यामुळे हा संशयाचा किडा मनात वळवळू देऊ नका. जोडीदाराचा फोन तपासण्याची सवय लागल्याने तुम्हाला ऑब्सेसिव-कंपल्सिव डिसऑर्डर होऊ शकतो. संशयाची सवय तुमच्या नात्यावरती परिणामकारक ठरू शकते.

Relationship Tips
Relationship Tips : आजकाल इतके घटस्फोट का होत आहेत? मोटीव्हेशनल स्पीकर शिवानी यांनी सांगितले की...

तुमच्या नात्यात संवाद होणं गरजेचं

कुठल्याही नात्यात संवाद संपले की वाद निर्माण होतात. संवाद नसल्याने गैरसमज वाढत जातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत नेहमी बोलत राहिले पाहिजे. जर तुम्ही सतत जोडीदाराकडे संशयाच्या नजरेने पाहत असाल तर त्याला तुमच्या सोबत असुरक्षित वाटू लागते. त्यामुळे तुमच्या वरील विश्वास निघून जातो.

जर तुम्हाला जोडीदारावर प्रेम असेल आयुष्यभराच्या चांगल्या आठवणी निर्माण करायच्या असतील तर त्याच्यासोबत बोलत रहा. त्यांना वेळ द्यावा त्यांना समजून घ्या.

प्रामाणिक रहा

नात्यातला कमी झालेला विश्वास वाढवणार हे खूप कठीण काम आहे. नात्यात प्रामाणिकपणा असेल पारदर्शकता असेल तर विश्वास आपोआप टिकून राहतो. पण जर नात्यात लपवाछपवी सुरू असेल तर मात्र विश्वास पळून जातो. त्यामुळे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रामाणिक रहा. 

Relationship Tips
Relationship Tips: नात्याला संशयाचे ग्रहण? या नऊ गोष्टी लक्षात ठेवा

नात्यासाठी १०० % द्या

जर तुमचा जोडीदार तुमच्या नात्यासाठी शंभर टक्के योगदान देत आहे. तर तुम्हीही तसेच केलं पाहिजे. कुठलेच नाते एका बाजूने टिकू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जोडीदार असलेला विश्वास कायम ठेवा. आणि यांना त्यासाठी शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करा.

Relationship Tips
Relationship Tips : हा रुसवा सोड सखे; रूसलेल्या पत्नीला असं मनवा, ती पटकन होईल खुश

पर्सनल स्पेस द्या

जोडीदाराच्या पर्सनल स्पेसमध्ये इंटरफेयर करू नका. असं केल्याने तुमच्यावर असलेला विश्वास कमी होऊ लागतो. त्यामुळे त्याला योग्य ती स्पेस द्या. जोडीदाराला कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी यांना भेटण्याची मुभा द्या. तर पती किंवा पत्नीच्या नजरेत तुम्ही एक चांगले जोडीदार होऊ शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.