विवेक आणि अमृता कॉलेजमध्यील मित्र होते. त्यांची मैत्री प्रेमाच्या उंबरठ्यावरची होती. कॉलेजमध्ये होते तेव्हा सतत एकत्र राहणाऱ्या या दोघांना त्यांचे मित्र चिडवायचे. हे तर बेस्ट कपल आहे असेच म्हणायचे. अमृता अन् विवेक दोघांनाही हे चिडवणं आवडायचं. त्यामुळे तेही त्यांच्या मित्रांना विरोध करायचे नाहीत.
त्या दोघांनीही ते प्रेम मान्य केलं आणि ते प्रेमात पडले. प्रेमात आकंठ बुडालेले हे दोघे एकमेकांना क्षणभरही दूर जाऊ देत नव्हते. पण, खरी अडचण वाढली जेव्हा हे दोघे करिअरमध्ये पुढे सरकले.