Relationship Tips: बुमराह अन् संजनापासून शिका प्रेम कसं निभवायचं ते, महिनोंमहिने भेटत नाहीतर तरीही आहे अतूट नातं

क्रिकेट जगतात अशी एक जोडी आहे ज्यांच्याकडून नातं मेंटेन कसं ठेवायचं हे प्रत्येक पती पत्नीनं शिकलं पाहिजे.
Relationship Tips
Relationship Tips
Updated on

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने नुकतचं पत्नी नताशा स्टॅनकोविक हिच्यासोबत घटस्फोट घेतला. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या घटस्फोटाची चर्ची जोरदार रंगली होती. अखेर दोघांनी 18 जुलैला सोशल मीडियावर पोस्ट करत दोघांनी वेगळा मार्ग निवडल्याची घोषणा केली. मात्र, त्यांच्या घटस्फोटामागचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यांच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे.

खरतरं कोणतही नातं असो ते टिकवताना अनेकदा तडजोड करावी लागते. पती पत्नीच्या नात्यात अनेक चढ उतार येत असतात. लग्नानंतर नातं नीट ठेवणं, ते मेंटेन करणं ही जबाबदारी दोघांचीही असते. पण एकाने एखादी जरी चूक केली तर त्याचा परिणाम नात्यावर होता कदाचित हार्दिक नताशामध्ये असचं काहीसं झालं असेल आणि त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला असेल.

Relationship Tips
Relationship Tips : हा रुसवा सोड सखे; रूसलेल्या पत्नीला असं मनवा, ती पटकन होईल खुश

पण क्रिकेट जगतात अशी एक जोडी आहे ज्यांच्याकडून नातं मेंटेन कसं ठेवायचं हे प्रत्येक पती पत्नीनं शिकलं पाहिजे. महिनोंमहिने भेटत नाहीतर तरीही दोघांमध्ये अतूट नातं पाहायला मिळतं. वैवाहिक जीवनात आनंदी राहण्यासाठी आणि नातेसंबंध दृढ करण्यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

विश्वास ठेवा, नकारात्मक विचारांपासून दूर राहा

नातेसंबंधात प्रेम आणि विश्वासाचे मूल्य जवळजवळ समान आहे, म्हणून आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणे सर्वात महत्वाचे आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारापासून कितीही दूर असलात तरीही, तुमचा त्याच्यावर/तिच्यावर पूर्ण विश्वास असेल तर कोणतीही अडचण येणार नाही.

बुमराह आणि संजना दोघांचाही एकमेकांवर खूप विश्वास आहे. याशिवाय तुमच्या जोडीदाराने नकारात्मक विचारांपासून दूर राहावे, नेहमी सकारात्मक गोष्टी समोर ठेवल्याने तुम्ही दोघेही आनंदी राहाल.

Relationship Tips
Relationship Tips: नात्याला संशयाचे ग्रहण? या नऊ गोष्टी लक्षात ठेवा

कामाचा दबाव समजून घेणे

जमप्रीत बुमराहने एका मुलाखतीदरम्यान संजनासोबतच्या नात्याविषयी भाष्य केलं होतं. यावेळी त्यांन सांगितलं की, क्रिकेटच्या खेळासोबतच खेळाडूवर येणारे दडपण संजन नेहमी समजून घेते. तिला माझ्यावर असलेलं दडपण समजते. वाईट काळात योग्य काळ शोधण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही दोघं इतर विषयांवर चर्चा करतो ज्यामुळे दोघांच्या नात्यात आनंद निर्माण होईल.

अशा प्रकारे अंतर व्यवस्थापित करा

अनेक महिने एकमेकांपासून दूर राहिल्यानंतरही बुमराह आणि संजना यांनी आपले नाते मजबूत ठेवले आहे. फोन कॉल्स, मेसेज आणि व्हिडीओ कॉल्सच्या मदतीने दोघेही रोज एकमेकांच्या संपर्कात राहतात. व्यस्त वेळापत्रक असूनही ते एकमेकांसाठी वेळ काढतात. त्यामुळं तुमचं नातं टिकवण्यासाठी तुम्ही शेअरिंग आणि काळजीची विशेष काळजी घ्या.

Relationship Tips
Relationship Tips : जोडप्यांमध्ये वाढणाऱ्या भांडणाचे कारण असू शकतं ‘मायक्रो चिटींग’, पण हे नक्की आहे तरी काय?

छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा

जोपर्यंत तुम्ही छोट्या गोष्टींकडे वादाकडे दुर्लक्ष करता तोपर्यंत भांडणे वाढत नाहीत. त्यामुळे ही भांडणे सोडा आणि लांबच्या प्रसंगी वेळोवेळी भेटण्याचे नियोजन करत रहा. याद्वारे तुम्ही एकमेकांचे महत्त्व चांगल्याप्रकारे समजून घेऊ शकाल, संजना आणि बुमराह देखील त्यांचे नाते त्याच पद्धतीने सांभाळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.