आजकालच्या पालकांची एक तक्रार असते, ती म्हणजे मुलं बिघडली आहेत, आमचं काहीच ऐकत नाहीत. सर्वच घरात हा सूर ऐकायला मिळतो. काही वेळा मुलांना समजवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला पैशांची, नात्यांची किंमत शिकवली.
तुम्ही तुमच्या मुलांना या गोष्टी सांगता तेव्हा ती त्यांना पटते का?, मुलं तुमचं ऐकतात का? नाही. मुलांना मारून अन् त्यांना ओरडून ती सुधारणार नाहीत. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? (Parenting Tips)