Raksha Bandhan 2023 : भाऊ-बहिणीचं अनमोल नातं, या 5 गोष्टींची काळजी घेतली तर नात्यात कधीच येणार नाही दुरावा

Brother Sister Relationship Tips : भाऊ-बहिणींमध्ये कितीही वाद झाले तरीही यांचे नाते अतिशय खास असते. पण काही गोष्टींची काळजी घेतली तर नक्कीच हे नाते अधिक घट्ट होऊ शकते.
Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2023 Sakal
Updated on

भाऊ-बहिणीमध्ये कितीही वाद असले तरीही हे दोघं गरजेच्या वेळेला नक्कीच एकमेकांच्या पाठीशी खंबीर उभे राहतात, एकमेकांना नेहमी साथ देतात. आयुष्यात मित्र-मैत्रिणी असणे, नक्कीच आवश्यक असते. पण बहीण-भावाचे नाते याहूनही खास असते. हे नाते अधिक मजबूत व्हावे, यासाठी जाणून घ्या सोप्या टिप्स...

बहीण-भावाचे बाँडिंग 

बहीण व भावामधील बाँडिंग मजबूत व्हावे, असे वाटत असेल तर यासाठी एकमेकांना जास्तीत जास्त वेळ देणे आवश्यक आहे. यासाठी वेळात वेळ काढून आपल्या भावाला - बहिणीला वेळ द्या. आपल्या मनातील गोष्टी भावंडांसह शेअर करा. यामुळे तुम्हा दोघांमधील बाँडिंग पुन्हा सुधारण्यास नक्कीच मदत मिळेल.

एकमेकांची काळजी घ्या

भाऊ-बहिणीमधील दुरावा कमी करायचा असेल तर आपण एकमेकांची काळजी घ्यायला सुरुवात करा. तुमच्या भावाला किंवा बहिणीला तुमच्या जवळील एखादी गोष्ट हवी असल्यास त्याला/तिला ती वस्तू द्यावी. तुमच्या वस्तू भाऊ-बहिणींना वापरण्याचे स्वतंत्र द्यावे. 

Raksha Bandhan 2023
रक्षाबंधन पौर्णिमेलाच का साजरा केला जातो?

उदाहरणार्थ तुमच्या भाऊ अथवा बहिणीला महत्त्वाच्या कामासाठी तुमच्याकडील लॅपटॉप वापरायचा असेल तर त्याला/तिला लॅपटॉप वापरू द्यावा. 

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan Gift Ideas : यंदाचं रक्षाबंधन बनवा खास, बहिणीला गिफ्ट करता येतील अशा झकास आयडिया!

मान-सन्मान द्या 

आपल्या भाऊ-बहिणीची इतर लोकांसमोर खिल्ली उडवू नका. कारण लोकांसमोर अपमान केल्यास त्यांचे मन दुखावू शकते. नातेवाईकांसमोर किंवा तुमच्या मित्रपरिवारासमोर भाऊ- बहिणीला आदराची-प्रेमाची वागणूक द्या.  

भावना व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य द्या

भाऊ-बहिणीला इतके स्वांतत्र्य द्या की ते आपल्या मनातील कोणतीही गोष्ट तुमच्यासमोर मोकळेपणाने मांडतील. प्रत्येक वेळेस आपण त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला किंवा वाद घातले तर तुमच्या नात्यातील गोडवा हळूहळू कमी होऊ शकतो. तसंच त्यांच्या प्रत्येक निर्णयात भाऊ-बहीण म्हणून तुम्ही सदैव पाठिशी राहाल, असा विश्वासही त्यांना द्यावा. 

Raksha Bandhan 2023
Raksha Bandhan 2024: वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो देशातील प्रत्येक राज्यात रक्षाबंधनाचा सण, जाणून घ्या

वाद मिटवा

एखाद्या गैरसमजुतीमुळे भाऊ-बहिणीमध्ये वाद निर्माण झाले असतील तर अबोला धरण्याऐवजी तुमच्यातील गैरसमज दूर करा. दोघांनीही एकमेकांचे बोलणे ऐकावे- समजून घ्यावे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून वाद मिटवण्याचा प्रयत्न करावा. तसंच दोघांनीही एकमेकांना सॉरी बोलून वादावर पडदा टाकावा. 

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.