Relationship Tips : बोलायचं खूप आहे पण सुरूवात कुठून करायची कळत नाही? या विषयांवर जोडीदारासोबत मारा दिलखुलास गप्पा

मतभेद झाले की वाद होतात आणि वाद झाले की संवाद संपतो
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips :

नवरा-बायकोच्या नात्यात काहीवेळी इतकी गुंतागुंत होते की, संवाद संपून फक्त वाद उरतात. मतभेद झाले की वाद होतात आणि वाद झाले की संवाद संपतो. पुन्हा संवाद सुरू होण्यासाठी काहींना २ दिवस लागतात तर काहींना दोन तीन महिनेही लागतात. काही लोक तर यामुळे नातंही संपवण्याचा विचार करतात.  

वाद झाले की अबोला असणं हे साहजिक आहे. पण बोलायला सुरूवात कोणी करायची,पहिल्यांदा नेहमी मीच सुरूवात का करू असाही विचार केला जातो. पण त्यावेळी कोणीतरी सुरूवात करणं महत्त्वाचं असतं. नाहीतर अबोला वाढत जातो.

केवळ वाद झाल्यावरच नाहीतर कधी कधी एकमेकांसोबत असताना काय बोलावं हे सुचत नाही. जोडीदार दूर राहणारा असेल तर अनेक विषयांवर गप्पा मारता येतात. पण, रोजच जोडीदारासोबत नक्की काय बोलायचं हे कळत नाही. तर तुम्हाला आमचे हे विषय नक्की आवडतील. (Relationship Tips)   

Relationship Tips
Relationship Tips: चिडचिड्या स्वभावाच्या बायकोला कसं सांभाळावं? जाणून घ्या

कुटुंबातल्या सदस्यांबद्दल बोला

लॉंग डिस्टंस कपल्समध्ये बोलण्यासारखे बरेच काही असते. जे लोक दिवसभर एकत्र राहतात ते घरगुती गरजा, किराणा या व्यतिरिक्त अनेक विषयांवर एकमेकांशी बोलू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराशी कुटुंब, मित्र, भावंडे, सहकारी इत्यादींबद्दल बोलू शकता.

बालपणीच्या गोष्टी

बालपणात माणूस नेहमी हरवून जातो. लहानपणी तुम्ही कसे वागलात, एखादा गमतीशीर किस्सा याबद्दल तुम्ही बोलू शकता. तुमचे मित्र, मैत्रिणी, टिव्हीवरील शो, लहानपणीचे शाळेतले दिवस यांच्याबद्दल बोलू शकता. जोडीदाराला तुम्ही लहानपणी कसे होता, तुमचे फोटो पहायला नक्की आवडेल.  (Relationship Tips In India) 

Relationship Tips
Relationship Tips: अशाप्रकारे कराल आपल्या पार्टनर सोबतच नातं आणखीच घट्ट

अनेक गोष्टींचे खुलासे

वाद कोणत्या गोष्टीवरून झाला आहे हे लक्षात आले तर त्यामागे तुम्ही कबुली देणे आवश्यक आहे. काहीवेळा जोडीदाराने अबोला सोडावा म्हणून तुम्ही सरळ तुमची चूक मान्य करून त्याच्या मिठित शिरा. तो नक्की तुम्हाला माफ करेल.

भविष्याशी कनेक्ट करा

तुम्ही प्रेमात असाल किंवा विवाहित असाल तर तुमच्या नात्याची स्वप्न रंगवा. तुम्ही जेव्हा एकत्र असाल तेव्हा एकमेकांच्या होणाऱ्या मुलांची, त्यांच्यासोबत फिरण्याची, एकत्र असताना रोमॅन्टीक होण्याची तुम्ही पाहिलेली स्वप्न जोडीदाराला मोकळेपणाने सांगा.

केवळ स्वप्ने नाहीतर तुमचे ध्येय, तुम्हाला कसे यशस्वी व्हायचे आहे त्याबद्दल जोडीदाराला सांगा. यामुळे, जोडीदाराला तुमच्याबद्दल अधिक समजेल आणि तोही तुमचे ध्येय पूर्ण करण्यासाठी मदत करतील.

Relationship Tips
Relationship Tips : सासू-सुनेत नेहमी भांडणं व्हायलाच हवीत का? असं होईल सासूसोबत Strong Relation

तुमच्या प्रेमकथेचा चित्रपट इमॅजिन करा

तुमची प्रेमकथा बॉलीवूडशी कनेक्ट करा बॉलीवूड हा एक विषय आहे जो कधीही जुना होऊ शकत नाही. तुम्ही दोघेही चित्रपट पहायला जा. त्या चित्रपटात जोडीदाराला अभिनेता आणि अभिनेत्रीच्या जागी ठेवा. किंवा तुम्ही पाहिलेला एखाद्या चित्रपटाची कथा जोडीदाराला सांगा. आणि त्या अभिनेत्रीच्या जागी दिसली असे सांगा. हे ऐकून नक्कीच तिला बरे वाटेल.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.