Relationship Tips : जोडीदाराला लग्न करायचं आहे की तो करतोय फसवणूक हे कसं ओळखाल?

Boyfriend-Girlfriend Relationship Tips In Marathi : जोडीदार तुमच्याशी लग्न करेल की नाही? हे पाच मुद्दे वाचा, तुमचं तुम्हालाच उत्तर मिळेल
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips :

जीवनात प्रेमात पडणारे अनेक आहेत. मात्र प्रेम लग्नापर्यंत नेणारे कमीच आहेत. असे लोक काही कारणास्तव जोडीदारापासून वेगळे होतात. आणि त्यांना दुसऱ्या व्यक्तीशी लगीनगाठ बांधावी लागते. यामागे अनेक कारणे असू शकतात. मात्र, त्यात प्रामुख्याने प्रियकर अन् प्रेयसी यांपैकी एकाला लग्न करायचे नसते. फक्त प्रेम,नाते हवे असते अशीही उदाहरणे आहेत.

अनेकवेळा मुलं मुलींना प्रेमाच्या,लग्नाचे अमिष दाखवून त्यांच्यासोबत राहतात. पण जेव्हा जबाबदारी घेण्याची वेळ येते. तेव्हा मुलं पाठ फिरवतात. कारण, त्यांना इतर जबाबादारी असते. किंवा इतर लग्न सोडून इतर गोष्टीत ज्यादा रस असतो. पण मुलींसाठी ही गोष्ट सोपी नसते. (Relationship Tips Marathi)

Relationship Tips
Relationship Tips: हेल्दी रिलेशनसाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नात्यात वाढेल प्रेम

एखाद्या मुलासोबत आयुष्य घालवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींना अचानक नातं तोडावं लागतं. तेव्हा त्यांना मनाची तयार करावी लागते. जर तुम्हीही एखाद्या रिलेशनमध्ये असाल तर तुमचा जोडीदार तुमची साथ निभावेल की मध्येच सोडून जाईल, हे ओळखण्याच्या काही सोप्या टिप्स पाहणार आहोत.

 

तुम्ही त्याच्या कुटुंबाला भेटलात का? (Relationship Tips In Marathi)

जर तुमचा जोडीदार तुम्हाला त्याच्या कुटुंबाशी ओळख करून देण्यास टाळाटाळ करत असेल. तर कदाचित तुम्हाला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला गांभीर्याने घेते तेव्हा त्याला आपल्या जोडीदाराची त्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी ओळख करून द्यायची असते. जर तुमचा पार्टनर वारंवार हे टाळत असेल तर कदाचित तो तुमचे नाते पुढे नेण्यास पूर्णपणे तयार नसेल.

Relationship Tips
Relationship Tips: लग्नाच्या अनेक वर्षानंतरही प्रेमात सातत्य हवंय, तर मग 'या' गोष्टी करायलाच हव्यात

तुमच्या कुटुंबाबत त्याला किती माहिती आहे? (Girlfriend Boyfriend Relationship Tips)

आपण जेव्हा एखाद्याशी मैत्री करतो तेव्हा त्याला सर्वकाही सांगत असतो. पहिल्या किंवा दुसऱ्या भेटीत तर घरी कोण असतं, बाबा आई काय करतात. याबद्दलही चर्चा होते. पण प्रियकर यातील काहीही विचारत नसेल. तुमच्या घरी झालेले वाद, काही चांगल्या गोष्टी जाणून घेण्यात त्याला रस नसेल तर नक्कीच त्याला तुमच्याशी लग्न करायचे नाही.

आपल्या जोडीदाराने आपल्या कुटुंबाला जाणून घ्यावे आणि समजून घ्यावे अशी प्रत्येकाची इच्छा असते. जर तुमचा जोडीदार असे करत नसेल तर तो लग्नाबाबत अजूनही ठाम नाही हे नक्की.

Relationship Tips
Relationship Tips: हेल्दी रिलेशनसाठी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, नात्यात वाढेल प्रेम

तो लग्नासाठी टाळाटाळ करतोय का? (Boyfriend not Loyal with you)

लग्न हा एक मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाची मानसिक तयारी करण्यासाठी अनेकजण वेळ घेतात. जर तुमचा जोडीदार लग्न पुढे ढकलण्यासाठी नेहमीच नवनवीन कारणं काढत असेल, जसे की "हे काम संपले की आपण लग्न करू" किंवा "आपण थोडे अधिक करियर करू आणि मग आपण लग्न करू," तर कदाचित तो सेटल झाल्यानंतरही लग्न करायचे नाही.

अशी कारणं देत असेल तर ओळखून जा की तो तुम्हाला टाळतोय. जर तुमचा जोडीदार सतत लग्न पुढे ढकलत असेल, तर तो लग्नासाठी किती तयार आहे याचा तुम्ही विचार केला पाहिजे.

Relationship Tips
Relationship Tips : प्रियकर छोट्या-छोट्या गोष्टींवरुन रागवत असेल तर अशी काढा त्याची समजूत

तो सेटलमेंटचं कारण देतोय का? (Your boyfriends is not ready for marriage)

कारण, ज्याला लग्न करायचंच आहे तो अशी कारणं देत नाही. करिअर, सेटलमेंट या गोष्टी जोडीदारासोबतही चांगल्यारितीने होऊ शकतात. पण, तुमचा बॉयफ्रेंड जर सेटल होऊदे मग पाहू. किंवा सेटल झाल्यानंतरही लग्नाच्या विषयावर टाळाटाळ करत असेल तर तो तुम्हाला फसवेल हे नक्की.

सेटल झाल्यानंतर तो लग्न नको म्हणत असेल, तर कदाचित या मोठ्या निर्णयासाठी अजूनही तो तयार नसेल. कदाचित अन्य काही कारणांमुळे तो लग्न पुढे ढकलत असेल.

Relationship Tips
Relationship Tips : संशयाचा किडा तुमच्या डोक्यात वळवळत असेल तर या गोष्टी नक्की करा, जोडीदारावरील प्रेम अन् विश्वास वाढेल!

तो लिव्ह-इनमध्ये राहूयात म्हणतोय का ? (Live-In Relationship)

लिव्ह-इन रिलेशनशिप हा एकमेकांना जाणून घेण्याचा पर्याय असू शकतो, परंतु लग्नासाठी हा एकमेव पर्याय नाही. जर तुमचा प्रियकर नेहमी लिव्ह-इनचा आग्रह धरत असेल आणि लग्नाबद्दल बोलण्यास टाळाटाळ करत असेल, तर ही धोक्याची घंटा आहे. कारण, तो अद्याप लग्नासाठी तयार नाही. कदाचित त्याला लग्नाच्या जबाबदाऱ्यांची भीती वाटत असेल किंवा त्याला सध्या आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.