Relationship Tips : जोडप्यांमध्ये वाढणाऱ्या भांडणाचे कारण असू शकतं ‘मायक्रो चिटींग’, पण हे नक्की आहे तरी काय?

What Is Micro Cheating: जोडीदार तुमच्यासोबतही करत असेल मायक्रो चिटींग तर ते कसं ओळखावं?
Relationship Tips
Relationship Tipsesakal
Updated on

Relationship Tips : 

जोडीदाराला कंटाळलेले लोक एक नव्या आधाराच्या शोधात असतात. त्यामुळेच सध्या घटस्फोट आणि दुसऱ्या लग्नाचे प्रमाण वाढले आहे. लग्नासारख्या पवित्र नात्यात सध्या एक्स्ट्रा मॅरेटिअल अफेअर्सचे फॅड आहे. त्यामुळे जोडीदाराला फसवून काही गोष्टी केल्या जातात.

आजकाल केल्या जाणाऱ्या या फसवणुकीला मायक्रो चीटिंग म्हणतात. यामुळे अनेक नाती प्रभावित होत आहेत. तुमच्यापैकी बरेच जण असतील ज्यांनी याबद्दल वाचले किंवा ऐकले असेल. (Relationship Tips)

Relationship Tips
Relationship Tips: नात्याला संशयाचे ग्रहण? या नऊ गोष्टी लक्षात ठेवा

लग्नाचा जोडीदार सोबत असताना दुसऱ्या व्यक्तीकडे आकर्षित होण्याचेही प्रमाण वाढले आहे. मायक्रो चिटींग म्हणजे जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत असताना दुसऱ्याच्या जवळ जाऊ लागता. त्यामुळे जीवनातील खऱ्या जोडीदाराची आपण नकळत फसवणूक करू लागतो, त्याला मायक्रो चिटींग म्हणतात.  

हे जाणूनबुजून किंवा नकळत घडते. आजकाल बहुतेक लोक त्यांचा वेळ घरी नसून ऑफिसमध्ये घालवतात. त्यामुळे, नकळत अनेक गोष्टी इतरांसोबत शेअर करू लागतात. हळूहळू त्यांना त्यांच्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टीही सांगू लागतात. आणि याला मायक्रो चीटिंग म्हणतात.

Relationship Tips
Relationship Tips : बोलायचं खूप आहे पण सुरूवात कुठून करायची कळत नाही? या विषयांवर जोडीदारासोबत मारा दिलखुलास गप्पा

मायक्रो चीटिंगमध्ये नक्की काय होतं?

तुम्ही तुमच्या जोडीदाराला देत असलेला वेळ कमी होतो. तुम्ही जोडीदाराला वेळ देणं कमी करता आणि याउलट जी व्यक्ती आवडू लागली असेल तिला वेळ देऊ लागता.

ज्याच्याशी तुमची बॉन्डिंग हळूहळू वाढत आहे. त्या व्यक्तीसोबत जास्त आनंदी वाटू लागतं. या काळात एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराला प्राधान्य द्यायला विसरते. त्यामुळे नात्यात अंतर वाढू लागते आणि आपापसात भांडणेही वाढतात.

Relationship Tips
Relationship Tips : पती पत्नीच्या नात्यात गोडवा अन् बळकटी वाढवतात या 3 गोष्टी, तुम्ही फॉलो करता काय?

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय हे कसे ओळखाल?

  • तुमचा जोडीदार सतत फोनवर असेल, कॉल्स आणि चॅटींग करत असेल तर तो तुम्हाला फसवत असेल.

  • तुमच्या जोडीदाराच्या फोनवर डेटिंग ॲप्स असेल तरीही मायक्रो चीटिंग होण्याची शक्यता असते.

  • तुमच्या जोडीदाराला तुम्हाला कोणत्याही खास कार्यक्रमात घेऊन जाणे आवडत नसेल, तर त्याने त्याच्या मनात दुसऱ्या कोणासाठी तरी जागा बनवली आहे असे समजा.

  • तुमच्यासोबत ट्रिपला जायला नकार देणारा जोडीदार मित्र-मैत्रिणींसोबत सहलीला जात असेल. तर, तो तुम्हाला फसवत आहे.

  • तुमचा जोडीदार काही गोष्टी तुमच्यापासून लपवत असेल, खोट बोलत असेल. तर, तो तुमची फसवणूक करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.